Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जावळीतील मोहरे शिंदे गटाच्या गळाला; पदाधिकारी गेले मूळ शिवसैनिक पक्षातच

करहर / वार्ताहर : शिवसेनेतून पन्नास आमदार फुटून वेगळा शिंदे गट अस्थितत्वात येवून भाजप आणि शिंदे गट असे निविन सरकार स्थापन झाले. शिंदे गटात सर्वच ठिका

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील 22 गावातील 141 घरकुल मंजूर; निशिकांत भोसले-पाटील यांच्या पाठपुरव्याला यश
फलटण येथील बांधकाम व्यावसायिकावर खूनी हल्ला; राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह अन्य एकावर गुन्हा
सातारा हद्दवाढीत समाविष्ट भागासाठी 48.50 कोटी निधी

करहर / वार्ताहर : शिवसेनेतून पन्नास आमदार फुटून वेगळा शिंदे गट अस्थितत्वात येवून भाजप आणि शिंदे गट असे निविन सरकार स्थापन झाले. शिंदे गटात सर्वच ठिकाणाहून शिवसेना पदाधिकारी प्रवेश करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम ग्राउंड असलेल्या जावळीत मात्र त्यास प्रतिसाद मिळत नव्हता. आता मात्र काही मोजके मोहरे शिंदे गटाच्या गळाला लागल्याने जावळीचा गड अबाधित राखण्याची जबाबदारी निष्ठावंत शिवसैनिकांवर आल्याने ते जिवाचं रान करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
जावळी तालुका आज जरी सातारा मतदार संघास जोडला गेला असला तरी पूर्वी हा जावळी मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आजही जावळीत सेनेच संघटन मजबूत आहे. हे प्रत्येक निवडणुकात दिसून आले आहे. सत्ता संघर्षाच्या निमित्ताने शिवसेनेत फूट पडली आणि शिंदे गट वेगळा झाला. पक्षाच्या अस्थित्त्वावर घाला घातला गेला. यातून पदाधिकार्‍यांना स्वतःकडे खेचण्याची रस्सीखे सुरू झाली. शिंदे गटाने राज्यातून पदाधिकारी स्वतःकडे खेचत शिवसेनेला खिळखिळे करण्यास सुरवात केली. जावळी त्यास अपवाद ठरली होती. अखेर जावळीतही खिंडार पडले. शिवसैनिकांमध्ये चलबिचल झाली. मात्र, जावळी तालुक्यातील असंख्य कट्टर शिवसैनिक आज ही मूळ शिवसेनेच्या ठाकरे गटाशी प्रामाणिक असल्याचे निदर्शनास येत आहेत. पदाधिकारी जरी गेले असले तरी मूळ शिवसैनिक त्यांच्या मागे न जाता. चार अक्षरी सेनेचे अस्थितत्व अबाधित राखण्याकरीता सामान्य शिवसैनिक धडपडत आहेत.
विशेष म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असेल्या मूळ कट्टर शिवसैनिकांनी शिंदे गटात सामील झालेल्या मोजक्याच पदाधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष करीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याची निष्ठावंत शिवसैनिकांनी प्रतिज्ञा घेतली आहे. आपले बळ येणार्‍या निवडणुकांच्या माध्यमातून दाखवून देण्याचा चंग बांधला आहे.

प्रतिक्रिया :
पक्षातून कोण गेले याला महत्व न देता तसेच त्यावर अधिक न बोलता पक्षातील ज्येष्ठ शिवसैनिकांचे मार्गदर्शन घेवून पक्षाच्या कामास आम्ही प्राधान्य क्रम देत आहोत. पक्ष किती मजबूत आहे. याचा प्रत्यय येणार्‍या काळात नक्कीच दाखवू शिवसेनेशी घट्ट नाळ असणारे मूळ शिवसैनिक मात्र जागेवरच आहे. त्यांच्याच जोरावर शिवसेनेचा भगवा येणार्‍या निवडणुकांत डौलाने फडकवू.
नितीन गोळे (शिवसेना तालुका प्रमुख जावळी)

COMMENTS