Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापनदिन उत्साहात

जामखेड ः  जामखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्धापनदिन 10 जून रोजी  जामखेड पंचायत समिती समोरील सेंट्रल

पाथर्डीतील खुनाच्या गुन्ह्यातील 10 आरोपी अवघ्या 12 तासात जेरबंद
दुष्काळग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करा ः मनसे
सोशल मीडियाच्या गुरफटलेल्या युवकांना संताचे कार्य  कळणे गरजेचे ;- डॉ.बंडूशेठ भांडकर

जामखेड ः  जामखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्धापनदिन 10 जून रोजी  जामखेड पंचायत समिती समोरील सेंट्रल बिल्डिंग येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आँफिस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला. फटाक्यांची आतषबाजी करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पक्षाचा 25 वा वर्धापन दिन पक्षफूटीनंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमध्ये ध्सावजारोहन करून साजरा केला. त्याचप्रमाणे जिल्हा व तालुका पातळीवर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. जामखेड मध्ये वर्धापनदिन साजरा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, उपाध्यक्ष बापूराव शिंदे, ऋषी कुंजीर, युवराज राऊत, बाप्पू कार्ले, अक्षय म्हेत्रे, अमर निमोणकर , विकास राऊत, विशाल कदम, आकाश बारहाते, अतुल जगताप, विकास वराट, निलेश बिराजदार, उमेश कांबळे, दादा महारनवर, मनोज वराट यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफूटीनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत जामखेड तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांनी तरूणांची मोट एकत्र बांधत जामखेड तालुक्यात चांगल्या प्रकारे संघटना बांधणी केली महेश निमोणकर यांची तालुकाध्यक्ष व बापुसाहेब शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड केली.

COMMENTS