Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतात शिक्षणापेक्षा लग्नावर सर्वाधिक खर्च

मुंबई ः भारत हा देश विविधतेने नटलेला देश असून, लग्नकार्य म्हटले की, सगळ्यांना उधाण येते. काय घेवू आणि काय नको, असे होते. ग्रामीण भागात देखील पैसा

बाबासाहेब दहे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला तीन दिवसांची पोलिस कोठडी
कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी नगरमध्ये कँडल रॅली..

मुंबई ः भारत हा देश विविधतेने नटलेला देश असून, लग्नकार्य म्हटले की, सगळ्यांना उधाण येते. काय घेवू आणि काय नको, असे होते. ग्रामीण भागात देखील पैसा नसल्यास प्रसंगी कर्ज काढून लग्न केले जाते. जेवणाळ्यावर होणारा खर्च, त्यासोबतच इतर खर्च लक्षात हा खर्च अनेकांच्या अवाक्याच्या बाहेर असतो, मात्र तरीही तो केला जातो. नुकत्याच एका अहवालातून धक्कादायक माहिती आली असून, भारतात शिक्षणापेक्षा लग्नावर सर्वाधिक खर्च होत असल्याची माहिती समोर आली आहे. वर्षाला तब्बल 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च लग्नावर होतो.
भारतात विवाह उद्योग अंदाजे 10 लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. अन्न आणि किराणा मालानंतर व्यवसायाचे हे क्षेत्र दुसर्‍या क्रमांकावर आहे. एका अहवालात ही माहिती उघड झाली असून यात भारतीय नागरिक शिक्षणाच्या तुलनेत लग्न समारंभांवर दुप्पट खर्च करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. भारतीय नागरिक दरवर्षी 80 लाख ते 1 कोटी विवाह होतात, तर चीनमध्ये 70-80 लाख तर अमेरिकेत 20-25 लाख विवाह होतात. या विवाह समारंभावर भारतात 10 लाख कोटी रुपये खर्च होत असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीजने हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, भारतीय विवाह उद्योगाचा आकार अमेरिकेच्या ( 70 अब्ज अमेरिकन डॉलर्स) जवळजवळ दुप्पट आहे. तर चीनच्या (170 अब्ज डॉलर्सपेक्षा) कमी आहे. अहवालानुसार, विवाहसोहळा उद्योग हा भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात व्यावसायिक क्षेत्र आहे. तर खाद्यपदार्थ आणि किराणा मालानंतर ( 681 अब्ज डॉलर्स) दुसरी सर्वात मोठी उद्योग श्रेणी आहे. भारतातील विवाहसोहळे हे भव्य असतात. या लग्न सोहळ्यात विविध गोष्टीवर मोठे खर्च केले जातात. यात दागिने आणि पोशाख यांसारख्या अनेक गोष्टी आहेत. तसेच वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांना देखील या विवाह सोहळ्याच्या अप्रत्यक्षपणे फायदा होतो.

COMMENTS