हिंदू समाजात सतीप्रथेनंतर प्रथमच परंपरा खंडित !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदू समाजात सतीप्रथेनंतर प्रथमच परंपरा खंडित !

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी म्हणून  उत्तराखंड स्थित जोतिष पिठाचे शंकराचार्य म्हणून नियुक्ती करण्

काचेचे घर आणि दगडफेक ! 
संघटक, मुत्सद्दी आणि प्रभावशाली सिद्धरामय्या !
ओबीसींचे कैवारी असाल, तर संसदेत आरक्षण द्या !

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी म्हणून  उत्तराखंड स्थित जोतिष पिठाचे शंकराचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे खाजगी सचिव स्वामी सुबोधानंद यांनी नरसिंहपुर च्या मध्यप्रदेश स्थित परमहंस आश्रमात घोषणा केली. स्वामी अविमुक्तेश्वरानंद जोतीषपिठाचे ४६ वे शंकराचार्य असतील. १५ ऑगस्ट १९६९ रोजी उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यात  झाला. त्यांचे मुळनाव उमाशंकर आहे. मात्र, त्यांच्या नावाविषयी कोणी उमाशंकर पांडे तर कोणी उमाशंकर उपाध्याय आणि तत्सम नावे जोडत आहेत. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की, जोतिष पीठाचे नवनियुक्त शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे प्रामुख्याने ओबीसी समुदायातून आहेत. शंकराचार्य या पदावर विराजमान होणारे स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे पहिलेच शंकराचार्य आहेत जे ब्राह्मणेतर समाजातून आहेत. स्वामीजींनी वयाच्या नवव्या वर्षापासून साधना करायला सुरुवात केली आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची खरी ओळख मात्र एक लढवय्या आणि आंदोलक म्हणून अधिक आहे. संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातून त्यांनी शास्त्री आणि आचार्य पदाचे शिक्षण घेतले आहे. मात्र, याच काळात विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी राजकीय कार्य देखील केले. विद्यार्थी जीवनात अनेक आंदोलने त्यांनी हाताळली आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेली आंदोलने आपण आठवली तर त्यांचा लढवय्या बाणा दिसतो. गंगा नदीला राष्ट्रीय नदी घोषित करावी म्हणून सन २००८ मध्ये त्यांनी ११२ दिवसांचे उपोषण केले होते. यातून त्यांची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. प्रकृती ढासळल्यामुळे शेवटी तत्कालीन शंकराचार्य आणि स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या सूचनेवरून त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी ,२०१५ मध्ये साधू समाजावर झालेल्या लाठी हल्ल्याविरोधात आंदोलन पुकारले होते.      नवे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची वैशिष्ट्ये आणखी खूप काही असतील परंतु, त्यांच्या शंकराचार्य होण्याने जे पद ब्राह्मणेतर समाजातून आलेल्या स्वामींकडे गेले हे हिंदू धर्मातील बदलाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. सतिप्रथा बंद झाल्यानंतर हिंदू धर्म समाजांत झालेला हा सर्वात मोठा बदल आहे, ही याठिकाणी लक्ष्यात घेण्याची बाब ठरते. मात्र, नवनियुक्त शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मात्र राम मंदिर समितीच्या ट्रस्टवर मात्र अविश्वास व्यक्त करून चौकशी ची मागणी केली आहे. ट्रस्टवर असणारे महासचिव चंपत राय आणि अमित मिश्र यांना ट्रस्ट मधून काढून चौकशी करावी, अशी मागणी करणारे स्वामी अविमुक्तेश्वरानंद हेच आहेत. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी शपथ घेताच संवैधानिक प्रतिष्ठित म्हणून धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतल्यावर संत मुख्यमंत्री होऊ शकत नाही,  किंवा तो “धार्मिक” राहू शकत नाही, असे स्पष्टपणे म्हणणारे स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे निर्भिड व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. धर्मातील राजकारणाच्या कथित हस्तक्षेपावर, त्यांनी सर्व राजकीय पक्षांवर धर्माचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सर्व पक्षांनी राजकारणात घुसखोरी केली आहे आणि ही प्रवृत्ती आता केवळ संत आणि द्रष्ट्यांशी संबंध ठेवण्यापुरती मर्यादित नाही तर ते मुख्य धार्मिक पदांवर त्यांची माणसे बसवत आहेत. विद्यार्थी जीवनापासून आंदोलन, लढाऊबाणा आणि स्पष्टवक्तेपणा असणारे नवे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद या पदावर अधिक अधिकारवाणीने भाष्य करणार, हे निश्चित आहे!

COMMENTS