Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चुनाभट्टीत रस्ता खचला दुचाकी आणि चारचाकी वाहने पडली खड्यात

मुंबई - मुंबईत पुन्हा एकदा रस्ता खचल्याची घटना घडली आहे. मुंबईतील चुनाभट्टीतील वसंत दादा पाटील इंजिनीअर महाविद्यालयासमोरील एक रस्ता खचल्य

दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने मोठा निर्णय, सर्व खासगी कार्यालये बंद ठेवणार |LOKNews24
लग्न लागताच नवरदेव बसला धरणे आंदोलनाला
रावसाहेब घोडके” संविधान गुणगौरव” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित 

मुंबई – मुंबईत पुन्हा एकदा रस्ता खचल्याची घटना घडली आहे. मुंबईतील चुनाभट्टीतील वसंत दादा पाटील इंजिनीअर महाविद्यालयासमोरील एक रस्ता खचल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेत रस्त्याच्या कडेला असलेली अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने खड्डयात पडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चुनाभट्टीतील वसंत दादा पाटील इंजिनीअर महाविद्यालयासमोरील एसआरए इमारतीचा रस्ता बुधवारी सकाळी खचला. या घटनेत स्थानिक रहिवाशांनी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने खड्यात पडल्या.रस्ता खचताच आसपासच्या इमारतींमधील नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. पोलीस, अग्निशमन दल आणि मुंबई महानगरपालिका कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. तसेच या इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचला दरम्यान, काही दिवसांपूर्वी मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्याची घटना घडली आहे. खोदकामामुळे मेट्रो स्टेशनजवळ रस्ता खचल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी खोदकाम करणाऱ्या चांडक बिल्डरच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.नाल्याच्या चेंबरजवळ खोल खोदकाम केल्याने त्याच्या भिंतीला तडे गेले होते. यामुळे मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या पायऱ्या आणि एस्केलेटरचा पाया आणखी कोसळण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला होता. या घटनेनंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली होती.

COMMENTS