कोपरगाव तालुका ः सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचा विचार करून कार्यान्वित ही केला. तसाच प्रयत्न माजी आमद

कोपरगाव तालुका ः सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचा विचार करून कार्यान्वित ही केला. तसाच प्रयत्न माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला आणि तिसर्या पिढीतील युवानेते विवेक कोल्हे यांनीही आग्रही असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वेचे पाणी पश्चिमेला वळवून पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे सूतोवाच केले आहे. या भूमिकेमुळे पाणी प्रश्नाची सोडवणूक होण्यास मदत मिळणार आहे. फडणवीस कोपरगाव येथे आयोजित विजय संकल्प जाहीर सभेत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री भागवत कराड, बांधकाम मंत्री दादा भुसे, विधानसभेच्या सभापती नीलम गोर्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, स्नेहलता कोल्हे,आ.आशुतोष काळे, आ.संजय शिरसाठ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे,माजी आ. बाळासाहेब मुरकुटे,रवींद्र बोरावके आदीसह विविध आजी माजी पदाधिकारी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, पश्चिमेचे नद्यांचे पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळते, ते पाणी पूर्वेला गोदावरी नदीची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवला असून तो लवकरच मंजूर होईल, या साठी लागणार निधी लागेल, त्यावेळी मोदी है तो मूमकिन है अस म्हणत पाण्याचा प्रश्न मार्गी लावू. यासाठी 50 हजार कोटी निधी आवश्यक आहे. तो देण्यासाठी मोदी आहेत. लवकरच हा आराखडा मंजूर करून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांचे नाव घेतफडणवीस म्हणाले की, ताई आमदार असतांना कोपरगाव तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि विकास केला आहे. यापुढेही विकासासाठी सहकार्य करत सरकार म्हणून गेल्या काही काळात मोठा निधी कोपरगावसाठी देण्यात आला आहे. तोट्यात जाणार साखर कारखानदारी व ऊस उत्पादक यांना जगविण्याचे काम मोदी यांनी केले. शेतकर्यांचे 10 लाख कोटी रु.चे उत्पन्न कर माफ केले. साखर कारखाने चालावे आणि ऊस उत्पादकांना भाव मिळावा यासाठी निधी उपलब्ध करून दिले आहे. इथेनॉल निर्मितीची मंजुरी देऊन शेतकर्यांचे आश्रू पुसण्याचे काम मोदी यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे याना निवडून देऊन नरेंद्र मोदींना तिसर्यांदा पंतप्रधान करण्याची आवाहन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांची कोल्हेच्या निवासस्थानी सदिच्छा भेट – कोपरगाव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आले असता, कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आ. सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या येसगाव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष . बिपीनदादा कोल्हे यांनी सत्कार केला. तर ना. फडणवीस यांचे सौ. रेणूका कोल्हे व श्रद्धा कोल्हे यांनी त्यांचे औक्षण केले.या प्रसंगी नितीनदादा कोल्हे, अमित कोल्हे,सुमित कोल्हे इशान कोल्हे आदीसह कोल्हे परिवार उपस्थित होते
COMMENTS