Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एमईटीचे महत्त्वपूर्ण पाऊल 

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रम

नाशिक  प्रतिनिधी: मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट अर्थात 'एमईटी'ने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात व्यवस्थापन कौशल्य शिकवणारा  पदव्युत्तर अभ्यासक्रम (Post

दिल्लीत 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत
करमाळा, कळंब येथे न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय

नाशिक  प्रतिनिधी: मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट अर्थात ‘एमईटी’ने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात व्यवस्थापन कौशल्य शिकवणारा  पदव्युत्तर अभ्यासक्रम (Post Graduate Diploma in Management (PGDM)) विद्यार्थ्यांच्या सोयीखातर उपलब्ध करून दिला आहे. या अभ्यासक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गीतकार, पटकथाकार, संवाद लेखक श्री. जावेद अख्तर यांनी आज आयोजित कार्यक्रमात केले.

या प्रसंगी बोलताना जावेद अख्तर यांनी म्हटले की,  “पूर्वी इच्छुकांना आवश्यक ते शिक्षण मिळत नव्हते. त्यांना काम करता करता अनुभव मिळवणं गरजेचं होतं.  यामुळे या अभ्यासक्रमासाठी एमईटीचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. जे काम सरकारने करणे गरजेचे आहे ते एमईटी करत असल्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन करावे लागेल.  अख्तर यांनी पुढे म्हटले की,  “हल्लीच्या काळात माहिती आणि ज्ञानाचा वेगाने मारा होऊ लागला आहे. याचा वेग जरी प्रचंड असला तरी त्यातून काही समस्याही  निर्माण होताना दिसत आहे. माहिती आणि ज्ञानाच्या या वेगवान माऱ्यात वरवरची माहिती मिळते आहे. वेगवान माहिती मिळवत असताना ती सखोल असणंही गरजेचं आहे. अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांमुळे वेगवान पद्धतीने आणि सखोल माहिती किंवा ज्ञान मिळण्यास मदत होईल अशी मला खात्री आहे.”

हा अभ्यासक्रम सुरू करण्यामागची कल्पना विषद करताना ‘एमईटी’चे संस्थापक अध्यक्ष श्री. छगन भुजबळ म्हणाले की “माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र हे झपाट्याने विकसित होत चालले आहे. विशेषतः मोबाईल आणि इंटरनेटच्या वापरामुळे या क्षेत्रात प्रचंड प्रगती होत असून जर विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण मिळाले तर इथे करिअर बनवण्याची विद्यार्थ्यांसमोर मोठी संधी आहे. ही संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये व्यवस्थापन कौशल्य शिकवणारा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला माध्यम आणि मनोरंज क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. ज्यामध्ये कवी, अभिनेता, विनोदवीर आणि लेखक श्री.शैलेश लोढा, अभिनेते श्री.स्वप्नील जोशी, अभिनेता आणि दिग्दर्शक-निर्माते श्री.आदिनाथ कोठारे, फेमस इनोव्हेशनचे संस्थापक श्री.राज कांबळे,  रॅडीफसन समूहाचे राष्ट्रीय सृजन संचालक श्री.प्रमोद शर्मा, दिग्दर्शक आणि लेखक श्री.अजित वाडीकर, व्हाईट रिव्हर डिजिटलचे सीईओ श्री.श्रेणिक गांधी हे उपस्थित होते. याशिवाय माध्यम आणि मनोरंज क्षेत्रातील अन्य नामवंत व्यक्तींनी या क्षेत्रासंबंधीच्या परिसंवादात भाग घेतला होता. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राची सद्यस्थिती व या क्षेत्रांमधील व्यवस्थापनाची गरज यावर परिसंवादात सहभागी झालेल्या मंडळींनी आपली मते मांडली.या परिसंवादामध्ये मान्यवरांनी क्रिएटीव्हिटीच्या व्यवसायाविषयी आणि माध्यमे तसेच मनोरंजन क्षेत्राची विश्वासार्हता वाढीच्या गरजेबाबच आपली मते मांडली. 

हवस समूहाचे चेअरमन श्री. बॉबी पवार यांनी बोलताना म्हटले की,  “वाचक आणि प्रेक्षक हेच आता स्वत: माध्यमे बनले आहेत कारण ते अनेक गोष्टी शेअर करत असतात आणि प्रतिक्रियाही देत असतात. एक चांगली गोष्ट पाहायला मिळत आहे की, मनोरंजन क्षेत्राला आकार देण्याचे कामही वाचक आणि प्रेक्षक करत आहेत.माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्र मृतावस्थेला लागले नसून उलट ते प्रत्येक माणसागणिक वाढत चालले आहे.” ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक श्री.अक्षय बर्दापूरकर यांनी यावेळी म्हटले की,  “माध्यम क्षेत्र हे अत्यंत असंघटीत क्षेत्र आहे.  या क्षेत्राला अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांमार्फत संघटीत करण्याचा जो प्रयत्न आहे तो अत्यंत स्तुत्य असा आहे. समालोचक, अभिनेते श्री. कुणाल विजयकर यांनी म्हटले की, संवादासाठीची साधने तीच आहेत मात्र तंत्रज्ञान बदलले आहे. “तुम्ही कसे लिहिता, कसा संवाद साधता आणि माहिती कशी देता याबाबी पूर्वीपासूनच सारख्या आहेत.  सृजनशीलतेची प्रक्रिया आणि पाया तोच आहे मात्र त्यासाठीची साधने ही महत्त्वाची भूमिका बजावतात.”

व्यवसाय प्रशासकीय व्यवस्थापन (एमबीए) अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राबाबत सखोल माहिती अवगत होण्यास मदत होणार आहे. याशिवाय क्षेत्रातील व्यवसाय आणि सर्जनशीलता यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान आत्मसात करण्यासाठी देखील हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. या पूर्णवेळ अभ्यासक्रमाचा संपूर्ण कालावधी हा २ वर्षांचा असून त्याला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (AICTE) मान्यता प्राप्त आहे. 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत असताना बीबीडीओ इंडियाचे चेअरमन श्री.जोसी पॉल यांनी हा अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल एमईटीचे अभिनंदन केले. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी देशासह जगभरात आपलं नावलौकिक करण्याइतपत योग्य होतील, असे पॉल म्हणाले. त्याचप्रमाणे हवस समूहाचे चेअरमन श्री. बॉबी पवार यांनी बोलताना एमईटी एज्युकेशनल ट्रस्टने काळाची गरज ओळखून शिक्षणाच्या पद्धतीत केलेल्या बदलांचे कौतुक केले. जाहिरात क्षेत्रात वेगाने होणाऱ्या आधुनिक बदलांच्या पार्श्वभूमीवर एमईटीने शिक्षण पद्धतीत केलेल्या सुधारणांचे पवार यांनी विशेष कौतुक केले.

परिसंवादासाठी आलेले मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचा एमईटीचे विश्वस्त श्री. पंकज भुजबळ आणि श्री जितेंद्र वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने चित्रपट, जाहिरात आणि डिजिटल क्षेत्रातील काही प्रसिद्ध मान्यवरांनी त्यांच्या शुभेच्छा ई-ग्रिटींगद्वारे पाठवल्या. 

माध्यम क्षेत्राची विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती मिळावी यासाठी हा एमबीए अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. अभ्यासक्रमातील संकल्पना विद्यार्थ्यांना नीट कळाव्यात यासाठी विविध प्रकारच्या मार्गांचा वापर करण्यात आला आहे. पुस्तकातील ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी या अभ्यासक्रमात विशेष काळजी घेण्यात आली आहे. जाहिरात, पत्रकारिता, डिजिटल, जनसंपर्क, ब्रँडचे व्यवस्थापन आणि संवाद, माध्यम  संशोधन, माध्यमातील विविध गोष्टी आणि ग्राहकांचा कल जाणून घेण्याची तंत्रे आणि मनोरंजन क्षेत्रातील विपणन यासारख्या विषयांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. नव्या युगातील संकल्पना जसे की आर्टिफिशिअल इंटीलिजन्स (AI), ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी (AR), व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी (VR) याबाबतही शिकवले जाणार आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास या अभ्यासक्रमामुळे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये व्यवस्थापन कौशल्यासाठी गरजेच्या असलेल्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळू शकणार आहे.

चौकट – 

अभ्यासक्रमात काय शिकवणार?

– जाहिरात, पत्रकारिता, डिजिटल, जनसंपर्क,  ब्रँडचे व्यवस्थापन आणि संवाद, माध्यम संशोधन, माध्यमातील विविध गोष्टी आणि ग्राहकांचा कल जाणून घेण्याची तंत्रे, मनोरंजन क्षेत्रातील विपणन. याबरोबरच नव्या युगातील संकल्पना जसे की AI, AR, VR.

फायदे :

– माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राबाबत सखोल माहिती 

– व्यवसाय आणि सर्जनशीलता यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान

– करिअर बनवण्याची विद्यार्थ्यांसमोर मोठी संधी.

COMMENTS