Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्व सौर योजनांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने पूर्ण करावी : दत्तात्रय पडळकर

अहिल्यानगर : महावितरणच्या ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीज पुरवठा मिळावा यासाठी शासनाच्या धोरणानुसार सौर कृषी वाहिनी योजना २.०, प्रधानमंत्री सुर्या

दिल्ली येथील राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत  लोह्याच्या वर्षा तोंडारेची कास्यपदाकाची कमाई
पेठवडज जवळ खुले आम दारू विक्रीविरोधात  नागरिकांनी, दारूबंदी अधिकाऱ्याच्या कार्यालयावर घातला घेराव  
हिंगोलीत विद्युत अभियंत्यांवर फेकली चप्पल

अहिल्यानगर : महावितरणच्या ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीज पुरवठा मिळावा यासाठी शासनाच्या धोरणानुसार सौर कृषी वाहिनी योजना २.०, प्रधानमंत्री सुर्याघर मोफत वीज योजना आणि मागेल त्याला सौरपंप या सौर योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे कृषी ग्राहकांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या सर्व सौर योजनांच्या प्रगतीकडे प्राधान्याने लक्ष देऊन या प्रकल्पांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वांची मदत घ्या आणि या सर्व सौर योजनांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने पूर्ण करावीत असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (वितरण) दत्तात्रय पडळकर यांनी दिले. अहिल्यानगर येथील विद्युत भवनातील  सभागृहात महावितरणच्या अहिल्यानगर मंडळातील सर्व अभियत्यांची व अधिकाऱ्यांची शुक्रवार १७ जानेवारी रोजी आढावा बैठक  घेतली, याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधिक्षक अभियंता रमेशकुमार पवार उपस्थित होते. कार्यकारी संचालक(वितरण) दत्तात्रय पडळकर  यांच्याकडे नाशिक परिमंडळाचे पालकत्व देण्यात आलेले असून त्यानुसार प्रथमच अहिल्यानगर मंडळाची बैठक घेतली. यामध्ये विविध विषयांचा व योजनांचा संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेतला, राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (is of leaving) यासाठी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. त्यानुसार १०० दिवसांत महावितरणाने प्राधान्याने करावयाचे कामाचे नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश दत्तात्रय पडळकर यांनी दिले.

महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना सर्वोत्कृष्ठ व अखंडित वीज सेवा देणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य असून, यासोबतच थकबाकीदार ग्राहकांकडून वापरलेल्या वीज देयकांची १०० टक्के थकबाकी दरमहा वसूली करणे सुद्धा अत्यावश्यक आहे, अन्यथा थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करा. सोबतच वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यापेक्षा दिलेल्या विजेचे पैसे वेळेतच वसूल करणे महत्त्वाचे असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. इज ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून वीज जोडणी तथा इतर सेवा ग्राहकांना तत्काळ व ठराविक वेळेतच दिल्या गेल्या पाहिजेत यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावे. ग्राहकसेवा व वीज देयक थकबाकी वसुली यासर्व कामासाठी सर्व अभियंते व कर्मचारी यांनी आपल्या कार्यालयात दररोज वेळेत पोहचून कामाचे दैनंदिन नियोजन केले पाहिजे. नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या कालावधीत ग्राहकांना सेवा न दिल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा 

इशारासुद्धा त्यांनी यावेळी दिला. अनेक योजनांच्या माध्यमातून वीज गळती कमी करण्याबरोबरच वाहिन्यांचे विलगीकरण, आवश्यक त्या ठिकाणी एरियल बंच केबलचा वापर, रोहीत्रांची क्षमतावाढ या सर्व कामांना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले. 

मार्च अखेर परिमंडळात सर्वानी वीजदेयकाची शून्य थकबाकी मोहीम यशस्वी करून आणखी गतिमानतेने व उत्कृष्ठ ग्राहक सेवा देण्याचे आवाहन कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी केले. बैठकीला अहिल्यानगर मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी उपस्थित होते.  

COMMENTS