नागपूर : राज्य सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री विकास कामांपेक्षा खातेवाटपावर अधिक बैठका आणि चर्चा करत आहे. जनता उपाशी आणि सरकार तुपाश

नागपूर : राज्य सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री विकास कामांपेक्षा खातेवाटपावर अधिक बैठका आणि चर्चा करत आहे. जनता उपाशी आणि सरकार तुपाशी, अशी सध्याची अवस्था असून महाराष्ट्राला हे भूषणावह नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
तपास यंत्रणांची भीती दाखवून विरोधकांना गप्प केले जात आहे. कोणाकडे कुठले खाते जाणार याच्याशी जनतेला काही देणेघेणे नाही. सरकार आता मायबाप राहिला नाही. हे शिंदे -फडणवीस आणि पवार सरकार आता जनतेला लुटणारे सरकार झाले आहे. जनतेला वार्यावर सोडले आहे. अनेक भागांत पेरण्या झाल्या नाही. अवकाळी पावसाची मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. याचे कोणालाच देणेघेणे नाही. राज्याचे कृषिमंत्री शेतकर्यांना लुटायला निघाले आहेत. नकली पथक करून कृषी केंद्रावर आपलेच अधिकारी पाठवायचे व लुटायचे असे सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. कलंक या शब्दावरून भाजपा आणि ठाकरे गटामध्ये वाद सुरू असताना महाराष्ट्राला भाजपाने कलंक लावून ठेवलेला आहे, अशी टीका पटोले यांनी केली. आम्ही आणि राष्ट्रवादी अनेक वर्षे सत्तेत राहिलो. अजित पवार आमच्या सोबत कसे करायचे आणि कसे बाणा दाखवायचे हे आम्हाला माहीत आहे. ते आता का चूप आहेत, असा प्रश्न पटोले यांनी केला.
COMMENTS