Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकीय पक्षांचे अमाप पीक ?

देशभरात एकच पीक मोठ्या प्रमाणावर आल्यानंतर त्या पिकांची किंमत घसरते हा आजवरचा अनुभव. तसाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात बघायला मिळतांना दिसून येत आह

ठाकरे गटाचे भवितव्य काय ?
धर्मद्वेषाचा उन्माद
शरद पवारांची राजकीय चाल

देशभरात एकच पीक मोठ्या प्रमाणावर आल्यानंतर त्या पिकांची किंमत घसरते हा आजवरचा अनुभव. तसाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात बघायला मिळतांना दिसून येत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांचे अमाप पीक आल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांचे अमाप पीक लोकशाहीसाठी धोक्याचे ठरणार की, अनुकूल ठरणार हा भाग वेगळा असला तरी, राज्यातील पक्षांचे पीक मात्र मतदारांना विचार करायला लावणारे आहे. खरंतर पूर्वी विधानसभा निवडणुकी काँगे्रस आणि भाजप प्रमुख राष्ट्रीय पक्ष, तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस प्रादेशिक पक्ष म्हणून समोर येत. चार प्रमुख पक्ष सोडले तर इतर पक्षांची ताकद फारशी नसल्यामुळे त्यांना कुणी मोजत नसे. मात्र आजमितीस राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांच्यात दोन पक्ष, शिवसेनेत दोन पक्ष निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यातच मनसे, छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पार्टी, बसपा, वंचित बहुजन आघाडीसारखे अनेक पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यातच काल तिसरी आघाडी देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. कालच पुण्यात घेतलेल्या बैठकीत परिवर्तन महाशक्तीने 150 जागांवर एकमत केले असून उर्वरित जागांवर उमेदवारांची चाचपणी करून ते लढायचे की नाही, ते ठरवण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. या तिसर्‍या आघाडीत शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पार्टी, तर बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष यांचा समावेश आहे. शेतकरी आंदोलनामुळे राजू शेट्टी परिचित असून, त्यांची पश्‍चिम महाराष्ट्रात मोठी ताकद आहे, त्याचबरोबर दुसरीकडे छत्रपती घराणे म्हणून संभाजीराजेंविषयी एकप्रकारे आदर आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी प्रहार या संघटनेच्या माध्यतातून विविध जिल्हे, तालुके आणि गावा-गावांत आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. तसेच दिव्यांगांसाठी भरीव अशी कामगिरी केली आहे. त्याचबरोबर महत्वाचा फॅक्टर म्हणजे तिसर्‍या आघाडीने मनोज जरांगे आणि महादेव जानकर यांना सोबत घेण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. जर मनोज जरांगे आणि महादेव जानकर तिसर्‍या आघाडीत आल्यास तिसरी आघाडीची ताकद निर्णायक ठरू शकते. मनोज जरांगे यांचा महायुतीच्या नेत्यांवर विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर विशेष संताप असून, त्यांच्याविरोधात सातत्याने वक्तव्ये करून त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. शिवाय महायुतीचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, असा विडाच त्यांनी उचलला आहे. त्यामुळे मनेाज जरांगे यांनी जर उमेदवार उभे केल्यास त्यामुळे महायुतीचे नुकसान होईल यात शंकाच नाही. त्यामुळे यंदा राजकीय पक्षांचे अमाप पीक आल्यामुळे नेमके कुणाला मतदान करावे असा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण झाल्यास नवल वाटायला नको. वास्तविक पाहता अनेक देशांमध्ये बहुपक्ष पद्धती नाही. मात्र भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती जसा मतदान करू शकतो, तसाच प्रत्येक व्यक्ती आपला राजकीय पक्ष संघटना काढू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात यंदा राजकीय पक्षांचे अमाप पीक आले आहे. मात्र मतदान कुणाला होईल, यावर बरेच काही ठरणार आहे. महाराष्ट्रात काँगे्रस आणि भाजप दोन राष्ट्रीय पक्ष आहे. त्यातच आपने विधानसभा निवडणुकीतून अंग काढून घेत दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. शिवाय आप आपली ताकद महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभी करणार आहे, त्याचा महाविकास आघाडीला फायदाच होणार आहे. मात्र त्यासाठी अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात किती सभा घेतात, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे देखील स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. मनसे शिंदे गटासोबत एकत्र येवून काही जागा पदरात पाडून निवडणूक लढवेल असे वाटले होते, मात्र मनसेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे मुंबई, नाशिक आणि पुण्यात मनसेची काही मतदारसंघात मोठी ताकद आहे, तिथे मनसे कुणाला पाडतो, याचे उत्तर निकालानंतरच स्पष्ट होईल.

COMMENTS