Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये लाकडाची अवैध वाहतूक करणारे पीकअप पकडले

कर्जत तालुका प्रेस क्लबच्या पत्रकारांचे प्रयत्न

कर्जत प्रतिनिधी ः निम प्रजातीच्या लाकडाची अवैध वाहतूक करणारे पीकअप ( एमएच 16, ईवाय 8752) हे कर्जतच्या भांडेवाडी येथे पकडले आहे. कर्जत तालुक्यातील

पाथर्डी तालुका टंचाई आढावा बैठकीचे आयोजन – आ. मोनिका राजळे
 ’बाप्पाला पत्र ’ स्पर्धेत श्रीज्या मोहन रासकर सर्वप्रथम
पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण 

कर्जत प्रतिनिधी ः निम प्रजातीच्या लाकडाची अवैध वाहतूक करणारे पीकअप ( एमएच 16, ईवाय 8752) हे कर्जतच्या भांडेवाडी येथे पकडले आहे. कर्जत तालुक्यातील मुळेवाडी येथील संजय दत्तात्रय मुळे यांचे हे पीकअप असून हे वाहन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आणण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही कारवाई करण्यात आली आहे.
कर्जत तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष योगेश गांगर्डे हे कर्जतच्या बसस्थानकाजवळ उभे असताना मागील बाजूस नंबरप्लेट नसलेल्या पिकअपमधून लाकडाची वाहतूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पत्रकार प्रा. किरण जगताप, भाऊसाहेब तोरडमल, अस्लम पठाण यांना याबाबतची माहिती दिली. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांना कळवले. शेळके यांनी तात्काळ वनपाल सुरेश भोसले यांना कारवाई करण्याची सूचना दिली.  दरम्यान पत्रकारांनी गाडीचा पाठलाग केला व भोसले यांना त्याबाबतची माहिती दिली. भोसले यांनी तात्काळ भांडेवाडी येथे येऊन पिकअप पकडले. निम जातीच्या लाकडांची विनापरवाना अवैध वाहतूक करणारे पिकअप भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 51, 52 नुसार जप्त केले. यानंतर वनविभागाकडून ही वृक्षतोड कोणत्या ठिकाणी झाली याची पाहणी करून त्याचा पंचनामा केला जाईल. तसेच त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

COMMENTS