Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध दारूची वाहतूक करणारे जेरबंद

वाहनांसह 5 लाख 22 हजाराचा मुद्ेमाल जप्त

देवळाली प्रवरा ः राहुरी शहर व परिसरात पेट्रोलिंग करीत असताना चारचाकी वाहनातून देशी विदेशी दारूची वाहतूक करणार्‍या वाहनाचा पाठलाग करुन 2 व्यक्तीसह

कोविडचे संकट दूर होऊन नागरिकांचे जनजीवन सुरळीत व्हावे – तहसीलदार उमेश पाटील
हरवलेला मुलगा अवघ्या बारा तासात मुंबईत शोधला
सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांनी जमवली 500 कोटींची मालमत्ता

देवळाली प्रवरा ः राहुरी शहर व परिसरात पेट्रोलिंग करीत असताना चारचाकी वाहनातून देशी विदेशी दारूची वाहतूक करणार्‍या वाहनाचा पाठलाग करुन 2 व्यक्तीसह  मुद्देमाल, चारचाकी वाहनासह 5 लाख 22 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन देवळाली प्रवरा येथिल दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करुन जेरबंद करण्यात आले आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांचे विशेष पथक राहुरी शहर व परीसरात गस्त घालीत असताना एका चारचाकी क्रमांक एम एच 17 बीव्ही 7191 महिंद्रा कंपनीची एस यु व्ही कार मधुन अवैध दारु वाहतूक करीत असल्याचा संशय आल्याने सदर कारचा पाठलाग करुन पकडले असता चारचाकी वाहनात गोरक्षनाथ मोहन देठे (वय 29 वर्ष), दगडू पाराजी वाणी (वय 43 वर्ष दो. रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी) 22 हजार 800 रुपये किंमतीची देशी विदेशी दारू आढळून आली.चारचाकी वाहनासह त्या तरुणांना राहुरी पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला.चारचाकी वाहनासह 5 लाख 22 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर डाँ. बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलिस निरीक्षक पिंगळे, साहय्यक फौजदार गीते, पो.हे.का. सुरज गायकवाड, शिंदे,पारधी,वैराळ, ठाणगे, पो.ना. बागुल पो.का. ढाकणे, कुर्‍हाडे, भोसले, कदम, आजीनाथ पाखरे, सम्राट गायकवाड, अमोल गायकवाड, बडे यांनी सदर कारवाई केली आहे.पुढील तपास पोलिस करीत आहे

COMMENTS