Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवले नाही तर जलसमाधी घेऊ

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा इशारा

मुंबई प्रतिनिधी - शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना जर तात्काल

स्वराज्य चांदवड तालुका पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर
रेल्वेत प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या चोर महिलेला अटक | LOK News 24
अनियंत्रित ट्रकने 10 वाहनांना उडवले

मुंबई प्रतिनिधी – शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना जर तात्काल नुकसान भरपाई मिळाली नाही तर, शेतकर्‍यांना घेऊन मंत्रालया शेजारील अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. इशारा दिल्यानंतर तुपकर जालन्याहून मुंबईला रवाना झाले आहेत.
राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे कापूस सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने शेतकार्‍यांना कोणतीही मदत केली नाही, असा आरोप तुपकर यांनी केला आहे. त्याचबरोबर सोयाबीन आणि कापसाला भाव नाही. रब्बी हंगामात शेतकर्‍यांना रात्रीची नव्हे तर दिवसाची लाईट पाहिजे, अशा अनेक मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एक महिन्यांपासून करीत आहे. मात्र, सरकार याची कोणतीही दखल घेत नाही, असा आरोप देखील तुपकर यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळं रविकांत तुपकर हे शेतकर्‍यांना घेऊन मुंबईमधील अरबी समुद्रात जल आंदोलन करणार आहे. जालना जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांना घेऊन तुपकर हे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, आंदोलनापूर्वी तुपकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ’आपण दिलेल्या सामुहिक जलसमाधी इशार्‍यामुळे कोणताही दखलपात्र अथवा अदखलपात्र गुन्हा होवून ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास अथवा उच्च न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन होईल’. तसेच शासनाच्या वरील नमूद परिपत्रकातील अटी व शर्तीचा भंग झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील व आपणाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी तुपकर यांना दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी तुपकर यांना नोटीस बजावल्यानंतरही ते मुंबईत जलसमाधी आंदोलन करणार का, हे पाहावे लागणार आहे.

COMMENTS