Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात स्वराज्याची सत्ता आणायची असेल तर स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्याने रात्रंदिवस मेहनत घेऊन स्वराज्यासाठी काम केले पाहिजे

नाशिक - आज नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड विभाग या भागातील अनेक तरुणांनी महिलांनी जेष्ठ नागरिकांनी स्वराज्य पक्षांमध्ये प्रवेश घेतला हा कार्यक्रम

विवस्त्र करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक
ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण… महापौरांच्या प्रभागात पाण्याचे संकट
Osmanabad : चक्क…आकाशातून पडला दगड (Video)

नाशिक – आज नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड विभाग या भागातील अनेक तरुणांनी महिलांनी जेष्ठ नागरिकांनी स्वराज्य पक्षांमध्ये प्रवेश घेतला हा कार्यक्रम स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य संपर्काप्रमुख करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य पक्ष उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी,उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे,राज्य कोर कमिटी सदस्य विजय वाहुळे,नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरात,पुष्पाताई जगताप, नाशिक जिल्हा प्रमुख प्रा.उमेश शिंदे आशिष हिरे,डॉ रुपेश नाठे,शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख विजय खर्जुल, व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख नारायण जाधव,जिल्हा कार्याध्यक्ष नवनाथ वैराळ,उपजिल्हाप्रमुख डॉ. महेंद्र शिरसाठ,कामगार आघाडी जिल्हाप्रमुख दिनेश नरवडे, ज्ञानेश्वर कोतकर,विद्यार्थी आघाडी महानगरप्रमुख सागर पवार,जिल्हा सरचिटणीस सागर जाधव,योगेश गांगुर्डे,ज्ञानेश्वर भोसले,अण्णासाहेब खाडे इगतपुरी तालुकाध्यक्ष नारायण भोसले, नाशिक उपमहा नगर प्रमुख रेखा जाधव, शहर कार्याध्यक्ष रेखा पाटील, नाशिक तालुकाप्रमुख योगिता ढोकणे, शहर उपप्रमुख रागिनी आहेर, शहर संघटक नंदा चव्हाण हे उपस्थित होते.

 यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की राष्ट्रहिताचा मुद्दा तोच स्वराज्याचा अजेंडा या घोषणेप्रमाणे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांचे हात बळकट करण्यासाठी नाशिक जिल्हा महाराष्ट्रात अग्रगण्य क्रमांकावर राहणार नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक भागामध्ये स्वराज्याच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून येणाऱ्या लोकसभा,विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्याची संपूर्ण तयारी करण्याच्या उद्दिष्टाने येणाऱ्या काळात आपण सगळे काम करणार आहोत त्यासाठी जी काही मदत आमच्या वरिष्ठांकडून लागेल ति मदत प्रत्येक पदाधिकाऱ्याला दिली जाईल फक्त आपण विश्वासाने आणि निष्ठेने स्वराज्य पक्षात काम करणे गरजेचे आहे.

स्वराज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की स्वराज्यात येताना प्रत्येक पदाधिकाऱ्याचा विश्वास आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. स्वराज्य हे असे व्यासपीठ आहे जे व्यासपीठ तुम्हाला तुमच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करेल परंतु तुमच्याकडून सुद्धा स्वराज्याला तितक्याच प्रामाणिक आणि निष्ठेची अपेक्षा आहे आपलं नेतृत्व हे अत्यंत स्वच्छ व उच्च विचार सरणी असलेले नेतृत्व आहे स्वराज्य प्रमुखछत्रपती संभाजी महाराज हे प्रत्येक मावळ्यावर जिवापाड प्रेम करत असताना स्वराज्यातील प्रत्येक  सामान्य कार्यकर्त्याला त्याच्या महत्त्वकांक्षा त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. राजकारणात राजकीय घरातील मुलं मोठे होतातच परंतु छत्रपतींनी सर्वसामान्य घरातील मुलांना मोठ करण्याचे स्वप्न स्वराज्याच्या माध्यमातून हाती घेतलेल आहे. त्यामुळे आपली सुद्धा नैतिक जबाबदारी आहे पण सर्वजण स्वराज्यासाठी काम करताना तितक्याच विश्वासाने करणे गरजेचे आहे येणाऱ्या २०२४ च्या निवडणुका आपल्याला संपूर्ण ताकतीने लढायचे असून स्वराज्य प्रमुखांचा आदेश आलेला आहे त्यामुळे नाशिक महानगरपालिका,जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुकींसाठी आपण आज पासून कामाला लागले पाहिजे प्रत्येक गावात प्रत्येक घरात स्वराज्याचा मावळा तयार करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे निश्चितपणे 2024 स्वराज्यासाठी सुवर्णकाळ असेल यात कुठली शंका नाही आज ज्या पदाधिकाऱ्यांना आपण नियुक्त देणार आहोत त्यांनीही स्वराज्याचे विचारधारा समजून स्वराज्याच्या नियमांमध्ये राहून चांगली कामगिरी करून दाखवायचे आहे आपल्या सर्वांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा यावेळी उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे जिल्हाप्रमुख आशिष हिरे डॉ रुपेश नाठे नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात काम उभे करू शाखा उद्घाटन करण्यासाठी गाव निहाय कसे आहे नियोजन करायचे याबाबत मार्गदर्शन केले.

 हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला होता ते नाशिक जिल्ह्याचे पूर्व विभागाचे जिल्हाप्रमुख प्रा.उमेश शिंदे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले त्याचबरोबर प्रास्ताविक करत असताना स्वराज्य पक्षाची ध्येयधोरण नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी स्वराज्य पक्षात कशा पद्धतीने काम केले पाहिजे स्वराज्य पक्षाचे आचारसंहिता स्वराज्य पक्षाबाबत प्रत्येक कार्यकर्त्याची असलेली जबाबदारी याबाबत सखोल मार्गदर्शन करताना नाशिक जिल्हा हा निश्चितपणे येत्या दोन महिन्यात पाचशे शाखांचा टप्पा पूर्ण करेल त्यासाठी आम्ही तिन्ही जिल्हाप्रमुख आमच्या सोबत असलेले नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची टीम याबाबत उद्यापासून कामाचे नियोजन करून कामाला लागणार आहोत. वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी निश्चितपणे नाशिक जिल्हा हा यशस्वीपणे पार करेल सर्व सवंगड्यांना सोबत घेऊन एक दिलाने एक विचाराने काम करून नाशिक जिल्हा हा स्वराज्यासाठी येणाऱ्या काळात बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाईल यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू असा शब्द उपस्थित मान्यवरांना त्यांनी दिला.

 यावेळी अनेक प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना नवीन पद नियुक्ती देऊन जबाबदारी निश्चित करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेतकरी आघाडी विजय खर्जुल यांनी केले तर आभार  राज्य कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात यांनी केले केले.

COMMENTS