पुन्हा आमच्या भागात आला तर जीवेच ठार मारु… धमकी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुन्हा आमच्या भागात आला तर जीवेच ठार मारु… धमकी

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 7 मोरगे वस्ती परिसरातील शुभम भाऊसाहेब चव्हाण (वय 21) हा तरुण मालाचे पैसे घेण्यासाठी वॉर्ड नं. 2 मध्य

पैशाअभावी माध्यमिक शिक्षकांच्या मान्यता रखडल्या
खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा
राज्यात उष्माघाताचे चार बळी

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 7 मोरगे वस्ती परिसरातील शुभम भाऊसाहेब चव्हाण (वय 21) हा तरुण मालाचे पैसे घेण्यासाठी वॉर्ड नं. 2 मध्ये गेला असता, मटण मार्केटसमोर आरोपी खाजा सलीम शेख (रा. संजयनगर, वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर) याने व त्याच्या साथीदाराने शुभम चव्हाण या तरुणास शिवीगाळ करुन पुन्हा आमच्या भागात आला तर तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या धमकीप्रकरणी शुभम भाऊसाहेब चव्हाण या तरुणाने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी खाजा सलीम शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पंडित हे पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS