Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’ग्रंथसंवाद’ वाढला तर जगणे सुसंवादी होईल ः सुखदेव सुकळे

शिरसगाव ः श्रीरामपूर हे सेवाभावी वाचन संस्कृतीचे माहेरघर बनत असून त्यामध्ये डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी1977-78 पासून साहित्य चळवळीत भाग घेतला, त्या

खर्डा येथे भव्य ईद मिलन कार्यक्रम उत्साहात
रुग्णालयांसमोरील गर्दी आता पोलिसांचे टार्गेट ; विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले उपाययोजनांचे आदेश
हिंदू दलितांच्या लोकसंख्यानिहाय आरक्षणाकरीता लढा उभारणार – आ.नरेंद्र भोंडेकर

शिरसगाव ः श्रीरामपूर हे सेवाभावी वाचन संस्कृतीचे माहेरघर बनत असून त्यामध्ये डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी1977-78 पासून साहित्य चळवळीत भाग घेतला, त्यांनी लिहिलेला’ ग्रंथसंवाद’ म्हणजे वाचन संस्कृतीचा दीपस्तंभ आहे असा ग्रंथसंवाद वाढला तर जगणे सुसंवादी व माणुसकीचे होईल असे मत विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव, साहित्यिक सुखदेव सुकळे यांनी व्यक्त केले.
   येथील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या’ ग्रंथसंवाद’ पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर श्री सुकळे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य टी.ई. शेळके होते. यावेळी पत्रकार प्रकाश कुलथे, प्रा. बाबा खरात, सुदामराव औताडे पाटील, प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे, डॉ. प्रकाश मेहकरकर, सौ. मंदाकिनी उपाध्ये, आसरा प्रकाशनच्या प्रकाशिका सौ. मोहिनी काळे, डॉ. शिवाजी काळे, प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, प्रा. रामचंद्र राऊत, माजी मुख्याध्यापक भागचंद औताडे पाटील, माजी प्राचार्य किसनराव वमने, प्रा. शिवाजीराव बारगळ, लेविन भोसले, दतात्रय चव्हाण, विष्णू भगत, आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, कल्पनाताई वाघुंडे, सुभाष वा घुंडे, साहेबराव सुकळे, सुरेश बुरकुले, संजय बुरकुले, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, चंद्रभान फासाटे आदी उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत करून पुस्तकाचे महत्व सांगितले. सुखदेव सुकळे यांनी ग्रंथसंवाद नधील अनेक वैशिष्ठ्याचा परिचय करून दिला. प्राचार्य शेळके, पत्रकार कुलथे पुस्तक प्रकाशनाचा आनंद व्यक्त केला. सूत्रसंचालन संगीता फासाटे यांनी केले तर सौ मंदाकिनी उपाध्ये यांनी आभार मानले. अनेक मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS