मुंबई / प्रतिनिधी : आम्ही सर्व कायदेशीर प्रकिया लक्षात घेऊनच सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे अपात्रतेबाबत कुठलीही कार्यवाही होईल, असे वाटत नाही.
मुंबई / प्रतिनिधी : आम्ही सर्व कायदेशीर प्रकिया लक्षात घेऊनच सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे अपात्रतेबाबत कुठलीही कार्यवाही होईल, असे वाटत नाही. मात्र, तशी कुठलीही कारवाई झाली, तर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेतून निवडून आणू, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर शिवसेना (ठाकरे गट) खा. अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अरविंद सावंत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश विधानसभेच्या अध्यक्षांनी न्यायाधिकरण म्हणून काय केले पाहिजेत? असे आहेत. न्यायालयाच्या ताशेर्यांमधून स्पष्ट होत आहे की ते अपात्र होणार आहेत. अशा वेळेला उपमुख्यमंत्री ते अपात्र होणार नाहीत, असे सांगतात. उपमुख्यमंत्र्यांना न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांपेक्षा जास्त अधिकार आहे का?
COMMENTS