Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीमती शोभा दळवी यांना बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सन्मानगेवराई । प्रतिनिधीजिल्हा परिषद बीड यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार-

वृक्षतोड रोखण्यासाठी चार पथके तैनात
देवस्थान सुशोभीकरणास चार कोटीचा निधी मंजूर
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सन्मान
गेवराई । प्रतिनिधी
जिल्हा परिषद बीड यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार-2025 यंदा गेवराई तालुक्यातील कर्तव्यनिष्ठ शिक्षिका श्रीमती शोभा सुरेश दळवी (जि.प. प्राथमिक शाळा, रसुलाबाद) यांना जाहीर करण्यात आला.
दि. 1 जानेवारी 2025 रोजी बीड येथे झालेल्या भव्य समारंभात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या श्रीमती दळवी या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, उमापुर येथे कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने व प्रामाणिकपणे विविध उपक्रम राबवले आहेत. आयडॉल शिक्षिका म्हणूनही यावर्षी त्यांची निवड झाली आहे. साहित्य निर्मिती, तंत्रस्नेही शिक्षण, नवोपक्रम, आनंददायी शिक्षण, प्रयोगशील अध्यापन, इंग्लिश अ‍ॅक्टिव्हिटी, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, लोकसहभाग आदी अनेक उल्लेखनीय कार्यांमुळे त्यांचे कार्य विशेष ठरले आहे. यापूर्वी चकलंबा केंद्रातील प्राथमिक शाळा कासारवाडी व प्राथमिक शाळा रसुलाबाद येथील त्यांचे कार्य उत्कृष्ट राहिले आहे. या पुरस्काराबद्दल तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, तसेच सरपंच यांनी श्रीमती दळवी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या पुरस्कार वितरण समारंभास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेन रहेमान, शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुंवर (मा.), प्रियाराणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या मानाच्या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून श्रीमती शोभा दळवी यांचे अभिनंदन होत आहे.

COMMENTS