Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझी चूक झाली, मला फाशी द्यायची तर द्या ः जितेंद्र आव्हाड

मुंबई : मनुस्मृती दहनाच्या वेळी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले पोस्टर भाडले होते. यावरून म

रेल्वेत प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या चोर महिलेला अटक | LOK News 24
चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा | LOKNews24
मिलिटरी आपशिंगेच्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : मनुस्मृती दहनाच्या वेळी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले पोस्टर भाडले होते. यावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यभर आंदोलन केले आहे. मात्र याप्रकरणी आपली अनवधनाने चूक झाल्याचे मान्य करत आव्हाडांनी माफी मागितली आहे.  माझी चूक झाली, मला फाशी द्यायची तर द्या, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाडमधील आंदोलनात चूक घडल्याचे स्पष्ट केले. आव्हाड म्हणाले,माझे भाजपशी वैचारिक मतभेद आहेत. मी त्यांचा आयुष्यभर विरोध करणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणार्‍यांची माफी मागितली आहे. भगतसिंह कोश्यारी आणि चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली होती का? मला मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच ठिकाणी 97 वर्षांनी मनुस्मृती जाळली. मला फाशी द्या, मी मरणाला घाबरणारा कार्यकर्ता नाही. 185 किलोमीटर दूर जाऊन मी मनुस्मृती जाळली. मी गुन्हे झेलायला तयार आहे. मला तुरुंगात टाका, माझा लढा वैयक्तिक नाही. माझा कोणीही खून करणार नाही. विचारांची लढाई कायम राहील. जेव्हा भिडे, कोश्यारी, चंद्रकांत पाटील बोलले, तेव्हा कोणीही बाहेर आले नाही. ही लढाई विचारांची आहे, असे आव्हाड म्हणाले. माझ्या बापाचा फोटो फाडला, म्हणून माफी मागितली, असे ते म्हणाले. पोर्शे कार अपघाताचा मुद्दा मागे टाकण्यासाठी हा मुद्दा पुढे आणला आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.

COMMENTS