कोपरगाव तालुक्यात पती, पत्नीचा खुन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यात पती, पत्नीचा खुन

कोपरगाव / ता.प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील  आपेगाव शिवारातील गावच्या पूर्वेस सोमवारी रात्रीच्या सुमारास रहिवासी असलेले शेतकरी दत्तात्रय गंग

संजय शिंदे यांची प्रहार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड
नगरमधील सर्व दुकाने आजपासून बंद ; फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार, नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा
प्रोत्साहन निधीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार – विधानपरिषद आमदार सुनिल शिंदे

कोपरगाव / ता.प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील  आपेगाव शिवारातील गावच्या पूर्वेस सोमवारी रात्रीच्या सुमारास रहिवासी असलेले शेतकरी दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय-६५) व त्यांची पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय-६०) हे आपल्या घराच्या छतावर झोपलेले असताना अज्ञात आरोपींनीं त्यांना लोखंडी गजाच्या सहाय्याने रात्रीच मारून टाकले आहे.त्यांच्या पुणे स्थित मुलांना दोन दिवसापासून आपल्या आई-वडिलांचा घरी फोन उचलला जात नाही.त्यामुळे मुलांना शंका आल्याने त्यांनी आपल्या चुलत भाऊ पोपट भुजाडे यांना घरी जाऊन चौकशी करण्यास पाठवले असता हि भयावह घटना उघड झाली आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहेसदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील  आपेगावगावच्या पूर्वेस साधारण एक कि.मी.अंतरावर आपल्या शेतात घर करून रहात असलेले शेतकरी दत्तात्रय भुजाडे व त्यांची पत्नी हे राधाबाई भुजाडे दोघे राहत होते.त्यांना दोन मुले असून ते उच्च शिक्षित असून पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरी करत आहेत.त्यांनी आपल्या आई आणि वडिलांना सोमवार दि.३० मे पासून फोन करत होते.मात्र त्यांचा फोन ते उचलत नव्हते.त्यांना आधी काही शेताच्या कामात असतील अशी शंका होतीमात्र दोन दिवस होऊनही ते आपला फोन उचलत नाही म्हणून शंका आली होती.म्हणून त्यांनी आज आपले चुलत भाऊ पोपट भुजाडे यांना फोन लावला.व आपले आई आणि वडील फोन उचलत नाही काय भानगड आहे.म्हणून तू घरी जाऊन स्थिती जाऊन बघ अशी विनंती केली होती.सदर चुलत बंधू हे घरी गेले असता तेथे त्यांच्या घरास कुलुप होते.म्हणून त्यांनी खिडकीतुन डोकावून पाहिले मात्र आत त्यांना कोणताही सुगावा लागला नाही.म्हणून त्यांनी शेजारी असलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावर जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला.त्यात ते दोघे नवरा आणि बायको त्यांना मृत अवस्थेत आढळून आले आहे.त्यांनी या कामी तीळवणी येथील पोलीस पाटील सुदाम शिंदे यांना या धक्कादायक घटनेची माहिती दिली.या प्रकरणी पोलीस सूत्रांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.त्यांनी या प्रकरणी शहानिशा करून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.दरम्यान या ठिकाणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून सदर शव ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात रवाना केले आहे.अद्याप या प्रकरणी  गुन्हा दाखल केलेला नाही

COMMENTS