Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हुरडा पार्टीतून रंगतोय मैत्रीचा गोडवा

अशोक डक यांची पत्रकारांसोबत स्नेहमेळाव्याची तीस वर्षांची परंपरा कायममाजलगाव । प्रतिनिधीथंडीच्या दिवसांत शेतात जाऊन कवळी ज्वारीचा गरमागरम हुरडा शेक

श्री सिद्धेश्वर विद्यालय, माजलगाव -1978 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा द्वितीय गेट-टुगेदर उत्साहात
नॅशनल आझाद उर्दू शाळेत शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी
बीड : लिंबागणेश येथिल आठवडी बाजारास भरघोस प्रतिसाद (Video)

अशोक डक यांची पत्रकारांसोबत स्नेहमेळाव्याची तीस वर्षांची परंपरा कायम
माजलगाव । प्रतिनिधी
थंडीच्या दिवसांत शेतात जाऊन कवळी ज्वारीचा गरमागरम हुरडा शेकोटीत भाजून, तो चोळत एकत्र जेवणाचा आनंद लुटण्याची परंपरा म्हणजेच हुरडा पार्टी. शेती, निसर्ग आणि मैत्रीचा गोडवा जपणारा हा पारंपरिक महाराष्ट्रीयन सोहळा नातेसंबंध अधिक दृढ करणारा असतो.
पत्रकारांसोबत स्नेह आणि जिव्हाळ्याचे नाते जपण्याच्या उद्देशाने माजी सभापती अशोक आबा डक यांनी मनुरवाडी येथील आपल्या शेतात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पत्रकारांसाठी हुरडा पार्टीचे आयोजन केले. या उपक्रमातून पत्रकारांसोबतची मैत्री अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अलीकडच्या काळात हुरडा पार्ट्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. मकरसंक्रांतीच्या वाणासाठी लागणारी ज्वारीची कणसेदेखील सहज मिळत नाहीत. मात्र, डक परिवाराने गेल्या 30 वर्षांपासून जपलेली ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. या निमित्ताने पत्रकार मित्र एकत्र जमून गरमागरम हुरड्याचा आस्वाद घेत गप्पांच्या मैफिलीत रमले. पत्रकारांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असणारे आणि जिव्हाळ्याचे संबंध जपणारे म्हणून अशोक डक यांची ओळख आहे. गुरुवार, दि. 15 रोजी मनुरवाडी येथील शेतात ही हुरडा पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संभाजी शेजूळ, एन. टी. सोळंके, माजी सरपंच हरिभाऊ चंदनशिव यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. राजकीय, सामाजिक विषयांवर हास्यविनोदासह चर्चा रंगल्या. हुरडा पार्टीत रानमेवा, बोरे, हरभरा, गाजर, त्यानंतर शेकोटीवर भाजलेला हिरवा, लखलखीत हुरडा, शेंगदाण्याची चटणी, दही, गूळ यांचा आस्वाद घेतला. जेवणात झणझणीत पाट्यावरची वाटणातील वांग्याची भाजी, कडक बाजरीची भाकर, पापड, कांदा, गाजर आणि इंद्रायणी तांदळाचा सुगंधी भात यांचा मनसोक्त आनंद लुटण्यात आला. या कार्यक्रमास पत्रकार तुकाराम येवले, पांडुरंग उगले, कमलेश जाब्रस, पुरुषोत्तम करवा, सुभाष नाकलगावकर, वैजनाथ घायतिडक, रत्नाकर कुलथे, नागापुरे, परमेश्वर सोळंके, बाळासाहेब आडागळे, हरीश यादव, दिलीप झगडे, दिनकर शिंदे, विष्णू उगले, धनंजय माने, सय्यद अलीम यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.


अलीकडच्या काळात हुरडा पार्ट्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. ग्रामीण संस्कृती जपण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. या हुरडा पार्टीच्या निमित्ताने मैत्रीचे संबंध वृद्धिंगत होतात आणि सुखदुःखाच्या गप्पांना एक व्यासपीठ मिळते. त्यामुळे मी सातत्याने या उपक्रमाचे आयोजन करतो.
– मा. सभापती अशोक डक

COMMENTS