Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोहेगावच्या शेकडो कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश

कोपरगाव तालुका ः युवा नेते विवेक कोल्हे करत असलेल्या सामाजिक कामावर प्रभावीत होऊन विकासाच्या दूरदृष्टीला साथ देत आज पोहेगाव येथील अनेक कार्येकर्त

‘वंचित’च्या वतीने आयोजित सोलो डान्स स्पर्धा उत्साहात
बेलापुरात वीज मोटारीच्या केबल चोरणारे चोरटे पकडले
शेवगाव तहसीलमध्ये शेतकर्‍यांचे शिवपाणंद रस्तेप्रश्‍नी आंदोलन

कोपरगाव तालुका ः युवा नेते विवेक कोल्हे करत असलेल्या सामाजिक कामावर प्रभावीत होऊन विकासाच्या दूरदृष्टीला साथ देत आज पोहेगाव येथील अनेक कार्येकर्त्यांनी काळे गटाला सोडचिठ्ठी देऊन कोल्हे गटात जाहीर प्रवेश केला आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी जनतेच्या मनातला हक्काचा नेता आम्हाला विवेक कोल्हे यांच्या रूपाने मिळाला अशी बोलकी प्रतिक्रिया नूतन प्रवेश करणार्‍या सर्वांनी व्यक्त केली.
आशुतोष काळे यांच्या फसव्या हजारो कोटींच्या वल्गना असून त्याचे ताजे उदाहरण पोहेगाव रांजणगाव रस्त्याची दहा कोटींची चाळण झाली आहे.याचा अर्थ भ्रष्ट्राचार मोठ्या प्रमाणात सुरू असून जनतेच्या हक्काच्या निधीचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.दुसरीकडे कोल्हे कुटुंबाचे सत्ता नसताना देखील शेकडो विधायक कामे सुरू आहे.हजारो तरुणांना रोजगार देण्याचे काम विवेक कोल्हे करणार असल्याने येणारा आम्ही भक्कम नेत्याच्या पाठीशी जाणार असल्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले. यावेळी विवेक कोल्हे यांनी प्रवेश करणार्‍या नागरिकांचे स्वागत केले.विरोधी गटाने जो भ्रमनिरास जनतेचा खोटी जाहिरातबाजी करून केला आहे तो निश्‍चितच चुकीचा आहे.हजारो कोटी आले तर ते गेले कुठे प्रश्‍न आपण सर्वच व्यक्त करता आहेत तर त्यात तथ्य आहेच असे अधोरेखित केले. कोल्हे कुटुंबाने रोजगार प्रश्‍नावर काम केले आहे आणि तेच काम व्यापक स्वरूपात अधिक मोठे उभे करावे हे माझे प्रयत्न आहेत. कोल्हे गटात प्रवेश करणारे पोहेगाव येथिल युसीफ विश्‍वनाथ भालेराव, सागर दिनकर भालेराव, शिलाबाई नामदेव सोनवणे, कुणाल नरेंद्र भालेराव, विशाल सुनील भालेराव, गोरख विश्‍वनाथ भालेराव, दिनकर पावलास भालेराव, राजेंद्र मनोहर भालेराव, सुनिता राजेंद्र भालेराव, आकाश भालेराव, अजय भालेराव, कृष्णा भालेराव, सिद्धार्थ भालेराव, गौरव तपासे, अंकित निकम, साई भालेराव, अनिल भालेराव, अफसर शेख, अविनाश भालेराव, विनायक तपासे, नामदेव सोनवणे, केशव खरात, बाबासाहेब भालेराव, साहिल भालेराव यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी कोल्हे गटात प्रवेश केला.

COMMENTS