Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 रायगड मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

रायगड प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना दिवसागणिक मजबूत व बलाढ्य होताना दिसत आहे. विविध पक्षातील तरुण, ज्येष्ठ क

वर्षा पवार यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड 
जलसंपदा नोकरभरतीची 27 डिसेंबरपासून परीक्षा
यंदा कोकणात जाणार्‍या रेल्वे गाडयांचे वेळापत्रक कोलमडले

रायगड प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना दिवसागणिक मजबूत व बलाढ्य होताना दिसत आहे. विविध पक्षातील तरुण, ज्येष्ठ कार्यकर्ते महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात सामील होऊन घड्याळ हाती बांधत आहेत. सुधागड तालुक्यातील नाडसुर ग्रामपंचायत हद्दीतील धोंडसे, वैतागवाडी, नाडसुर आदिवासींवाडी, ठाणाळे आदिवासी वाडी व अन्य गावातील शेकडो ग्रामस्थांनी  पक्षप्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे  खा. सुनिल तटकरे, आ. अनिकेत तटकरे , आदिती तटकरे यांनी पक्षात जंगी  स्वागत केले. या पक्ष प्रवेशावेळी आ. अनिकेत तटकरे यांनी ए तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है अशी गर्जना केली. यावेळी सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष संदेश शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कुंभार, हिराताई हिलम तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुधागड तालुक्यातील  धोंडसे अंतर्गत रस्ता, वैतागवाडी अंतर्गत रस्ता, ठाणाळे आदिवासी वाडी अंतर्गत रस्ता, नाडसुर आदिवासी वाडी अंतर्गत रस्ता असे एकूण 26 लाखांचा आमदार फंडातून  विकासनिधीचे पत्र यावेळी देण्यात आले. 

COMMENTS