संगमनेर ः हवेतील दमटपणा व ढगाळ हवामान यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत असून यामुळे ऊस, सोयाबीन, भुईमूग, गहू, हरभरा व

संगमनेर ः हवेतील दमटपणा व ढगाळ हवामान यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत असून यामुळे ऊस, सोयाबीन, भुईमूग, गहू, हरभरा व भाजीपाला इत्यादी पिकांना यापासून नुकसान होत असून ही हुमणी आणि रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते मा कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याच्या वतीने अभियान राबवण्यात येत असून यासाठी माफक दरात औषधे उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले की पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रादुर्भाव वाढत असतो, यामुळे उसासह इतर पिकांनाही मोठे नुकसान होते तर उसाच्या वजनात व साखर उतार्यात घट होऊन शेतकर्यांचे नुकसान होते. ही आळी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारखान्याच्या वतीने अभियान सुरू करण्यात आले असून शेतकर्यांनी शेताच्या कडेला असल्या झाडांच्या फांद्या यांचा डहाळा करणे. रात्री काठीच्या साह्याने फांद्या हालवून पडलेली भुंगेरे गोळा करून ती कीटकनाशक मिश्रित पाण्यात टाकून मारणे. तसेच जवळच्या झाडांवर फवारणी करणे. भुंगेरे आकेषित करण्यासाठी प्रकाश सापळे लावने, उन्हाळी शेतीची नांगरट उभी आडवी करून जमीन तापू देणे, नींबोळी पेंडीचा वापर करणे अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच उभ्या उसात रासायनिक कीटकनाशकाचा वापर करायचा झालास जून जुलै महिन्यामध्ये जमिनीत 0.3% दाणेदार फिप्रोनील हे कीटकनाशक दहा किलो प्रति एकरी टाकावे व पिकास पाणी द्यावे. ज्यांना ड्रेसिंग करणे शक्य आहे त्यांनी अशा पिकात लिसेंटा हे कीटकनाशक ज्या पिकांवर हुमणी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तेथे त्वरित नियंत्रण केल्यास ही वाढ होणार नाही याबाबतच्या अधिक माहितीसाठी कारखान्याच्या ऊस विकास अधिकारी बाळासाहेब सोनवणे व विभागाशी संपर्क साधावा. तसेच हुमणी व तांबेरा पिकावरील प्रतिबंधात्मक औषधेही अत्यंत माफक दरात गट ऑफिसमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकरी व ऊस उत्पादकांनी या अभियानात सहभाग घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन व्हा. चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व सर्व संचालक मंडळांने केले आहे.
COMMENTS