Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आईस्क्रीममध्ये आढळले माणसाचे बोट

महिलेची पोलिसांत धाव; कंपनीवर गुन्हा दाखल

मुंबई ः येथील मालाड भागात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनात माणसाच्या बोटाचा एक तुकडा सापडला. सदर महिलेने युम्मो कंपनीकडून आईस्क्रीमची ऑनलाइन ऑर्डर

अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करा- भाई मोहन गुंड
इंडियाचे नाव पुसून टाकण्याचा विकृतपणा ः संजय राऊत
राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला ः उद्धव ठाकरे

मुंबई ः येथील मालाड भागात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनात माणसाच्या बोटाचा एक तुकडा सापडला. सदर महिलेने युम्मो कंपनीकडून आईस्क्रीमची ऑनलाइन ऑर्डर दिली होती. या घटनेनंतर तिने मालाड पोलिस ठाणे गाठून कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. आइस्क्रीममध्ये सापडलेले बोटाचे तुकडे पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. आईस्क्रीमज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही शोध घेण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले.
मलाडमधील एका महिलेने यम्मो कंपनीचे आईस्क्रीम ऑनलाईन मागवले होते. पण तिने ते खायला सुरुवात करताच तिच्यासमोर मानवी बोटाचा तुकडा दिसला. आईस्क्रीम कोनमध्ये बोटाचा तुकडा पाहातच ती महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काहीक्षण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजले नाही. पण त्यांना सर्व प्रकार समजल्यानंतर तात्काळ मालाड पोलिस ठाणे गाठले. ओरलेम येथील रहिवासी ब्रेंडन सेराओ (27) यांनी बुधवारी ऑनलाइन डिलिव्हरी पद्वारे यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन ऑर्डर केला होता. त्या महिलेने सांगितले की, आईस्क्रीम कोनमच्या आत सुमारे 2 सेमी लांब मानवी बोटाचा तुकडा होता. सेराओ हे व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांत धाव घेत आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. यम्मो आईस्क्रीम कंपनीविरोधात मलाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आईस्कीम कोनमध्ये आढळलेले मानवी बोट मलाड पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवले आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास कत आहेत.

COMMENTS