Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक पातळीवर नगरचा झेंडा फडकवताना नगरी नगरकरांना मायभूमीच्या ऋणातून उतराई होण्याचा ध्यास-पदमश्री पोपटराव पवार

जागतिक पातळीवर विविध देशांत आपापल्या स्वकर्तुत्वाने नाव,पद आणि प्रतिष्ठा मिळवलेल्या नगरकरांनाअहमदनगरसाठी काही करण्याची इच्छा असणं म्हणजे  परदेशस्थ नग

LOK News 24 I“संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची चौकशी करा
देवळाली नगरपालिकेकडून 3 ठिकाणी कृत्रिम विसर्जन केंद्र
पुरस्कार म्हणजे ऊर्जारूपी कौतुकाची थाप ः कुलगुरू काळकर

जागतिक पातळीवर विविध देशांत आपापल्या स्वकर्तुत्वाने नाव,पद आणि प्रतिष्ठा मिळवलेल्या नगरकरांना
अहमदनगरसाठी काही करण्याची इच्छा असणं म्हणजे  परदेशस्थ नगरी नगरकरांना  मायभूमीच्या ऋणातून उतराई होण्याचा ध्यास  असल्याची भावना आहे ,असे प्रतिपादन  पदमश्री पोपटाव पवार यांनी केले .शिंगवे येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या मनगाव प्रकल्पात ग्लोबलनगरी फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्डियाक ऍम्ब्युलन्सच्या लोकर्पण प्रसंगी ते बोलत होते .
ग्लोबलनगरी फाउंडेशन हि अमेरिकेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नगरकरांनी मिळून स्थापन केलेली संस्था असून जगातील अनेक देशात असणारे नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र या उपक्रमात सहभागी आहेत . कोव्हीड काळात नगरकरांसाठी काहीतरी करावे अशी सर्व ग्लोबलनगरी परिवाराची इच्छा होती .त्यामध्ये अत्यवस्थ ,तातडीच्या उपचाराची गरज असणाऱ्या तळागाळातील लोकांपर्यंत हि सेवा पोचवावी हि कल्पना समोर आली आणि त्यासाठी ग्लोबलनगरी फाऊंडेशनने डॉ.राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांच्या माऊली सेवा प्रतिष्ठाणची  निवड केली .
माऊलीच्या मनगाव प्रकल्पावर या अत्याधुनिक कार्डियाक ऍम्ब्युलन्स सेवा नगर जिल्ह्यातील गरजूंसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर चालवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ग्लोबलनगरी परिवाराने माऊलीवर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील असे डॉ.राजेंद्र धामणे यांनी या वेळी सांगितले  
ग्लोबलनगरीच्या सोबत नगरकरांसाठी व माऊलीच्या मानसिक आरोग्यविषयक उपक्रमामध्ये सहभागी होऊन  विविध समाजउपयोगी उपक्रम राबवण्यास आय लव्ह नगर आणि फिरोदिया ग्रुप कटिबद्ध असेल असे उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांनी या वेळी सांगितले. माऊलीच्या मायमाऊली जेष्ठ लेखिका व अनिवासी भारतीय निलूताई गवाणकर यांनी या उपक्रमास शुभेच्छा देऊन ग्लोबलनगरी आणि माऊलीने एकत्रितपणे आरोग्यसेवेसाठी काम करावे असे आवाहन या वेळी केले.
प्रसिद्ध हृदयरोग व मधुमेह  तज्ञ तसेच आनंदऋषीजी हॉस्पिटल व साईदीप हॉस्पिटलचे डॉ वसंत कटारियाही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते .
य वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुधीरभाऊ लांडगे,जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना व बँकेचे आप्पासाहेब शिंदे ,उद्योगपती दीपक दरे ,जेष्ठ नाट्यकर्मी व माऊलीचे भू दाते आबाजी व सौ मेघमलाताई पठारे ,शिंगवे,देहरे व नांदगाव गावचे सरपंच ,पंचायत समितीचे सदस्य व्ही डी काळे ,प्रा. सुरेशराव काळे
व मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते
या वेळी ग्लोबलनगरी परिवाराचे विविध देशातील सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे या कार्यक्रमात प्रत्यक्ष्य सहभागी झाले होते .
ग्लोबलनगरी फौंडेशनचे  अध्यक्ष मा. किशोरजी गोरे यांनी ग्लोबलनगरीची भूमिका विशद केली तर सचिव रोहित काळे व सदस्य लताताई शिंदे यांनी उपक्रमाची माहिती दिली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोनिकाताई साळवी यांनी केले तर डॉ. किरण धामणे यांनी आभार मानले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलमताई लोखंडे ,अशोक तानूरकर डॉ.सुचेता धामणे यांनी परिश्रम घेतले .
व्हिडीओ कॉन्फरसिंग साठी शांती ऑडिओचे राजूभाऊ ढोरे व त्यांच्या टीमने मोलाची मदत केली

COMMENTS