Homeताज्या बातम्यासंपादकीय

ट्रम्पना युद्ध संकल्पना कशी आवडते !

  जगातल्या अनेक देशांमध्ये अतिवादी विचारांच्या सत्ता सत्तेत आल्यामुळे, त्या त्या देशांचा ध्येय धोरणाचा भाग आता अतिवादी वाटायला लागला. ही गोष्ट आत

संसद अधिवेशनाच्या निमित्ताने..
गोदामाई प्रतिष्ठानचे कार्य युवकांसाठी कौतुकास्पद ः माजी मंत्री ढाकणे
बिहारच्या मतदार यादीत १८ लाख मृत, २६ लाख स्थलांतरित व ७ लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार

  जगातल्या अनेक देशांमध्ये अतिवादी विचारांच्या सत्ता सत्तेत आल्यामुळे, त्या त्या देशांचा ध्येय धोरणाचा भाग आता अतिवादी वाटायला लागला. ही गोष्ट आता अमेरिकेपासून सुरू झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अतिशय महत्त्वाचं डिपार्टमेंट असलेल्या संरक्षण विभाग, ज्याला डिफेन्स डिपार्टमेंट किंवा डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स म्हटलं जातं. त्या विभागाचं नाव बदलण्याचा निर्णय आता त्यांनी घेतला.  त्यावर त्यांनी स्वाक्षरी देखील केली. आता हा संरक्षण ‘विभाग युद्ध’ विभाग म्हणून पुकारला जाईल.  आता संरक्षण सचिव देखील आता युद्धसचिव आणि त्या विभागाचे सगळेच अधिकारी युद्ध अधिकारी म्हणून गणले जातील. अर्थात, हा जरी शब्दांचा फेरफार असला तरी, याच्यातून प्रवृत्ती दिसते आहे की, जगाला सातत्याने युद्धात ठेवण्याची मानसिकता यामागे दिसते. जे डोनाल्ड ट्रम्प अनेक युद्ध आपण बंद केल्याचा दावा करून, जागतिक शांततेचे नोबेल पुरस्कर आपल्याला मिळावा, असा आग्रह करतात; ते डोनाल्ड ट्रम्प संरक्षण सारखा शब्द वगळून युद्ध शब्द त्यांच्या शासन प्रमुखाच्या संदर्भात आणतात. याचा अर्थ त्यांच्या प्रवृत्ती मध्ये युद्धखोरी ही सर्वात वरच्या स्थानी आहे. जगातला कोणताही देश आपल्या विभागाला युद्ध विभाग असं म्हणून संबोधत नाही किंवा संबोधणार नाही किंवा तशी हिम्मतही करू शकत नाही. कारण, जग हे दुसऱ्या महायुद्धानंतर शांततेसाठी इतकं प्रयासरात होतं, त्यासाठी जागतिक संस्था निर्माण करून जागतिक शांतता आणि सौहार्दता निर्माण करण्यात आली. परंतु, ट्रम्प सारख्या राज्यकर्त्यांनी यावर पाणी फिरण्याचे काम सुरू केलं. कोविड काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना सारख्या संघटनेलाही दुर्लक्षित केलं. त्यानंतर जागतिक पातळीवरच्या जेवढ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्या दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये समन्वय स्थापन करण्यासाठी निर्माण झाल्या; त्या सगळ्या संस्थांना डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास उध्वस्तीकडे नेले आहे. अर्थात, केवळ एका देशाकडे हा अधिकार नसला तरी सर्वाधिक निधी ज्या देशांकडून पुरवला जात होता, तो देश म्हणजे अमेरिका. अमेरिका देशाचे राष्ट्रप्रमुख जेव्हा अशा संस्थांच्या बाबतीत भूमिका बदलतात, तेव्हा, त्या संस्था  कोलमडायला लागतात. आज जागतिकीकरणाच्या पातळीवर या संस्थांचे कोलमडणे जे जगाला अशांततेकडे नेणार आहे. जागतिकीकरणानंतर जगामध्ये जे दुष्परिणाम उभे राहिले, त्यातून त्या त्या देशातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात बेरोजगारीला सामोरे जावे लागले आहे.  तरुणांमध्ये असणारी ही बेरोजगारी हिंसक स्वरूपात प्रकट होताना दिसते आहे. त्यामुळे, जगातील अनेक देशात तरुणांची आंदोलनं हिंसक होताना दिसत आहेत. अशा काळात युद्ध हा शब्द घेऊन जर डोनाल्ड ट्रम्प हे सत्ता चालवत असतील, तर त्याचे आगामी काळात निश्चितपणे जगाच्या ध्येय धोरणांवर परिणाम होतील. जागतिक शांतता नांदण्यासाठी जगातील प्रमुख देशांनी पुढाकार घेतला होता. त्यात महाशक्ती म्हणून अमेरिका अग्रणी होते.‌ सोवियत रशिया ही एक महासत्ता होती. परंतु, सोवियत युनियन कोसळले आणि जगावर अमेरिकेने दादागिरी सुरू केली. त्याचा अविभाज्य परिणाम भारतावर लावलेल्या ट्रेड टेरिफ मधूनही स्पष्ट होतो. एकंदरीत पाहता डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाच्या नकाशावर युद्ध आणि युध्दखोर धोरण यास जणूकाही प्राधान्य दिल्याचे दिसते आहे. अतिवादी सत्ता जगाला विनाशाच्या दिशेने नेत आहे; जगाने वेळीच सावध व्हावे.

COMMENTS