पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये देखील अंतर्गत कलह असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी य
पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये देखील अंतर्गत कलह असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी या प्रकरणी स्पष्ट मत मांडत पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यास तीव्र विरोध केला आहे. तुम्ही एकाच महिलेला किती पदे देणार? असा कळीचा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून आपल्या 3 नेत्यांना विधान परिषदेवर पाठवणार आहे. त्यात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे व सिद्धार्थ कांबळे यांना संधी दिली जाण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकर यांच्या नावावर आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी त्यांनी थेट अजित पवार यांच्याकडे न्यायाची याचना केली आहे. यामुळे राष्ट्रवादीपुढे बाका प्रसंग उभा राहिला आहे. रुपाली पाटील ठोंबरे गुरुवारी एका ट्विटद्वारे म्हणाल्या की, एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे अजितदादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? कालपासून बातमी वाचत आहे. बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले.
COMMENTS