औरंगजेब अचानक नातेवाईक कसा झाला? ; नामांतराला स्थगिती दिल्यानंतर संजय राऊतांचा संताप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगजेब अचानक नातेवाईक कसा झाला? ; नामांतराला स्थगिती दिल्यानंतर संजय राऊतांचा संताप

नागपूर/प्रतिनिधी : राजीनामा देण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेवटच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंग

बाबूजींचे पुण्यस्मरण हे त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता होय : जगन्नाथ महाराज शास्त्री
करमाळा ते संगोबा रस्त्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करावी (Video)
ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये कोंम्बिग ऑपरेशनसह ऑल आऊट ऑपरेशन राबवणार : गृह राज्यमंत्री योगेश कदम

नागपूर/प्रतिनिधी : राजीनामा देण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेवटच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. त्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत, औरंगजेब अचानक नातेवाईक कसा झाला? असा सवाल केला आहे.
हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे अशी टीका ही त्यांनी केली. राऊत नागपूर दौर्‍यावर असून माध्यमांशी बोलताना त्यांनी टीका केली. यासंबंधी विचारण्यात आले असता संजय राऊत म्हणाले की, हेच भाजपावाले औरंगाबादचं संभाजीनगर कधी करत आहात असं विचारत होते. उस्मानाबादसंबंधीही तीच भूमिका होती दि. बा. पाटील यांच्या नावासाठीही यांनीच मोर्चे काढले होते. उद्धव ठाकरेंनी केंद्राची तसंच कोणाचीही पर्वा न करता हिंमतीने एका हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकभावनेचा आदर करत नामांतराचा निर्णय घेतला होता. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत. नामांतर रद्द करुन काय साध्य केले हे फडणवीसांना विचारले पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या हातात काहीच नाही, त्यामुळे त्यांना विचारणार नाही. एकीकडे शिवसेनेने हिंदुत्व सोडले म्हणून आक्रोश करत आहात, आणि दुसर्‍या बाजूला औरंगाबाद, उस्मानाबादसंबंधी निर्णयाला स्थगिती का देत आहात? राजकीय, आर्थिक, बुलेट ट्रेनसंबंधी निर्णय समजू शकतो. आरेचा विषय तुमचा जिव्हाळ्याचा होता हे समजू शकतो. त्यासाठी आम्ही संघर्ष करु. पण औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? स्थगिती देण्यासाठी औरंगजेब तुमचा कोण लागतो? निजामाच्या काळातील उस्मान कोण लागतो? लोकभावनेचा आदर म्हणून दी बा पाटील यांचे नाव दिले होते, असे संजय राऊत यांनी सांगितले.

COMMENTS