Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारकर्‍यांवरील लाठीचार्जचे समर्थन कसे करता येईल ?

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा सवाल

पुणे/प्रतिनिधी ः आळंदीत चुकीच्या व्यवस्थापनामुळे गर्दी झाली. त्यामुळे पोलिसांकडून वारकर्‍यांवर लाठीचार्ज केला गेला. या लाठीचार्जचे समर्थन कसे करत

शिर्डीतील साई मंदिरात पास सक्ती बंद | LOKNews24
अहमदनगर जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरु करण्याची मागणी
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहा-गणेश बजगुडे पाटील

पुणे/प्रतिनिधी ः आळंदीत चुकीच्या व्यवस्थापनामुळे गर्दी झाली. त्यामुळे पोलिसांकडून वारकर्‍यांवर लाठीचार्ज केला गेला. या लाठीचार्जचे समर्थन कसे करता येईल, असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला. तर ही घटना दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
वळसे पाटील म्हणाले की, हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या संस्कृतीला कालच्या घटनेने गालबोट लागले. आळंदीत योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यात आले नाही. त्यामुळे गर्दी वाढली, अशावेळी पोलिसांनी संयमाने न घेता केलेली लाठीचार्जचा प्रकार हा समर्थन करण्याचा विषयच नाही. असा आरोप पाटील यांनी केला. काल आळंदीत वारकर्‍यांवर झालेली लाठीचार्जची घटना निंदनिय आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून ज्या पद्धतीने पोलिसांनी वारकर्‍यांना मारले, ही घटना वेदनादायी आहे, तर अशी घटना घडायला नको होती. असे मत देहू संस्थानचे विश्‍वस्त हभप संतोष मोरे यांच्याकडून व्यक्त करण्यात आले. तर वारकरी व पोलिस प्रशासनाने सांमजस्य ठेवावे, असे आवाहन देखील मोरे महाराज यांनी केले. वारकर्‍यावरील लाठीचार्जची घटना ही वारकरी संस्कृतीला व परंपरेला लागलेले गालबोट आहे. असा आरोप हभप मोरे महाराज यांनी केले. देहू संस्थानचे विश्‍वस्त हभप संतोष मोरे महाराज म्हणाले की, पोलिसांनी संयम ठेवायला होता. तेथील अन्य वारकरी व विश्‍वस्तांची मदत घ्यायला हवी होती. परंतू तसे झाले नाही. आणि लाठीचार्ज झाला. तर वारकर्‍यांनी देखील सांजस्याची भूमीका ठेवली पाहिजे, होती, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

COMMENTS