Homeताज्या बातम्यादेश

देशाच्या ओबीसी विचारवंतावर हल्ला करणारे, फुले, शाहू, आंबेडकरवादी कसे?

डॉ. योगेंद्र यादव हे भारताच्या भूमीवर असलेलं ओबीसींच एक मोठं नाव आहे आणि अशा नावाच्या व्यक्तीवर हल्ला चढवणारे हे फुले-शाहू-आंबेडकरवादी असू शकत ना

बुध्दकालिन समाजाप्रमाणे भरभराट होवो !
राजकीय किंमत न चुकवण्याची खेळी !
शेअर मार्केट का गडगडतेय ! 

डॉ. योगेंद्र यादव हे भारताच्या भूमीवर असलेलं ओबीसींच एक मोठं नाव आहे आणि अशा नावाच्या व्यक्तीवर हल्ला चढवणारे हे फुले-शाहू-आंबेडकरवादी असू शकत नाही! त्यांचे वारस असू शकत नाही! ज्यांनी हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांचा आम्ही थेट निषेध करतो आहोत! महाराष्ट्राच्या भूमीवर अशा झुंडशाहीचे राजकारण करू पाहणाऱ्या कोणत्याही पक्षाला, व्यक्तीला, नेत्याला आम्ही माफ करणार नाहीत.

डॉ. रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर आणि ऍड. असीम सरोदे यानंतर श्याम मानव आणि आता थेट डॉ. योगेंद्र यादव अशा या बुद्धिजीवींच्या घराबाहेर आणि सभांमध्ये गोंधळ घालण्याचे प्रकार महाराष्ट्रात झाले. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारवंतांच्या सभेमध्ये अशा प्रकारचे गोंधळ लागोपाठ होण्याची, ही पहिलीच आणि ऐतिहासिक वेळ असावी! अशा प्रकारच्या घटना यापूर्वी महाराष्ट्रात घडल्या नाहीत, असे नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम चालत असताना अनेक वेळा ते रोखण्याचे प्रकारही याच महाराष्ट्रात घडले. परंतु, आता पुरोगामी किंवा परिवर्तनाचा विचार मांडणाऱ्या लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांच्या घरासमोर आणि सभांसमोर गोंधळ घालण्याचा प्रकार, हा महाराष्ट्रामध्ये पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकर यांची भूमी असलेल्या प्रदेशात फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार म्निहणविणाऱ्यांनीच करणं ही सर्वथा नवीन बाब आहे.  ही बाब लोकशाही ही आम्ही मानतो असं म्हणणाऱ्या संविधान वाद्यांनीच घडवून आणावी, ही त्यातली अतिशय दुःखद बाब आहे! राजकारण हे इतक्या खालच्या पातळीला जाऊ नये की, त्यांनी संविधानाच्या मर्यादाच ओलांडून टाकाव्यात. ज्या काळामध्ये संविधान बचावच्या नारा देऊन निवडणुका जिंकल्या जातात; ज्या संविधान बचाव च्या शब्दावर देशाची विभक्त झालेली जनता अखंडितपणे एक होते, ज्या संविधानाच्या बचावासाठी देशातील सर्वसामान्य लोक आपलं तन-मन-धन आणि सर्वस्व अर्पण करू पहातात, अशा संविधानवादी पुरोगामी आणि खास करून संविधान निर्मात्यांच्या विचारांशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांकडून जेव्हा घडते, तेव्हा, लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी केवळ प्रतिगामी नव्हे, केवळ संघ भाजप नव्हे, तर या देशातील आंबेडकरवादी म्हणून असणाऱ्या शक्ती ही क्रियाशील झाल्या आहेत का, याचा जाब जनतेसमोर आधी दिला गेला पाहिजे. या देशामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केवळ काही मोजके हिंदुत्ववादीच करत आहेत की, यामध्ये संविधानवादी म्हणवणाऱ्या विचारांच्या चळवळींनी ही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही सहभाग घेतला आहे का? लोकशाही ही सर्वस्वी लोकशाहीच्या मूल्यांवर चालणारी, स्वातंत्र्य-समता -बंधुता आणि न्याय यावर चालणारी व्यवस्था आहे. परंतु, अलीकडच्या काळामध्ये संघाच्या विचारांनी साऱ्यांना जखडून घेतले आहे की काय? डॉ. योगेंद्र यादव यांचा सारखा माणूस हा ओबीसी विचारवंत म्हणून जसा ओळखला जातो, तसा तो शेतकरी नेता म्हणूनही ओळखला जातो, तसा हा माणूस समाजवादी विचारवंत म्हणूनही ओळखला जातो आणि कार्यकर्ता म्हणून अखंड भारतामध्ये हा माणूस फिरतो. या देशाच्या निवडणुकीचं अचूक विश्लेषण करण्याची सर्वात पहिली शास्त्रीय आणि प्रामाणिक आणि इमानदारीने आणि सामाजिक भूमिकेतून ज्या माणसाने सुरूवात केली, निवडणूक विश्लेषण करताना हा माणूस या देशाशी कधी खोटं बोललेला नाही. या माणसाने ज्या-ज्या वेळी निवडणुकीच्या विषयी आपले विश्लेषण केले, त्या त्यावेळी अचूक अंदाज निघाले. जेव्हा त्यांचा अंदाज हरियाणाच्या संदर्भात कोसळला, त्यावेळेस त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केलं की, काय गडबड झाली आहे ती समजून घ्यावी लागेल आणि ती समजून घेतल्यानंतर त्या संदर्भामध्ये आक्रमक प्रचारासाठी उभे राहावं लागेल. महाराष्ट्रामध्ये त्यांची वैचारिक सभा असताना ती निश्चितपणे त्यांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीची उघडपणे बाजू घेतलेली आहे. ही बाजू घेत असताना त्यांनी काँग्रेसशी त्यांचे कायम मतभेद असतानाही, ते जाहीरपणे मांडूनही, त्यांनी काँग्रेसच्या आघाडीला मतदान करा हे त्यांच्या निवासस्थान असलेल्या राज्यात म्हणजे हरियाणा सारख्या राज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना आणि ओबीसींना आव्हान केलं. या देशामध्ये ओबीसींची संख्या सर्वाधिक असताना ओबीसींच वैचारिक नेतृत्व, राजकीय नेतृत्व मात्र अपवादानेच आहे. राजकीय नेतृत्व ओबीसींच राजकीय पक्ष म्हणून दिसत नाही. अशा वेळी अशावेळी डॉ. योगेंद्र यादव यांचा सारखा वैचारिक नेता ओबीसींच नव्हे तर या देशाच्या शेतकरी जातींचेही राजकीय नेतृत्व आणि वैचारिकही नेतृत्व करत असेल तर, त्या नेतृत्वाला निश्चितपणे प्रेरणा दिली गेली पाहिजे. परंतु, ज्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या भूमीला आपण परिवर्तनवादी आणि पुरोगामी म्हणतो, अशा भूमीवर या ओबीसी विचारवंतावर हल्ला करण्याची हिम्मत दाखवणारे, हे कसे फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे वारस असू शकत नाही! हे आम्ही आज  या आमच्या दखल:मधून मांडत आहोत! एक ओबीसी राजकीय विचारवंत तुम्हाला सहन होत नसेल तर, फुले शाहू आंबेडकरांचे ना.

COMMENTS