पुरोहितांचा आशिर्वाद घेणारे हिंदूंचे नेते कसे ?

Homeताज्या बातम्यादेश

पुरोहितांचा आशिर्वाद घेणारे हिंदूंचे नेते कसे ?

  चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील सर्वात खालचा घटक हा शूद्र म्हणजे आजचा ओबीसी. अनुसूचित जाती, जमाती समुदायाचा वर्णात समावेश नाही. ते वर्णबाह्य आहेत, हे अनेक

राहुल गवळीच्या कुटुंबियांना न्याय द्या
संभाजीनगरमध्ये पहिले शिक्षक साहित्य संमेलन
वायुसेनेचे मिराज-2000 कोसळले, पायलट सुरक्षित

  चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील सर्वात खालचा घटक हा शूद्र म्हणजे आजचा ओबीसी. अनुसूचित जाती, जमाती समुदायाचा वर्णात समावेश नाही. ते वर्णबाह्य आहेत, हे अनेक परिवर्तनकारी महापुरूषांनी आम्हाला सांगितले आहे. कदाचित, तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मी वर्तमान घटनांवर बोलण्याऐवजी काही पुरातन विषयांवर बोलणार आहे का?; नाही, तसे बिल्कुल नाही. फक्त विषय संदर्भासाठी घेतला एवढंच. तर, संदर्भ नेमका काय, असं विचारलं तर औरंगाबादमध्ये होणारी राज ठाकरेंची सभा. वास्तविक, आजचा ओबीसी म्हणजे हिंदू समुदायाने कृष्ण काळापासून यज्ञ आणि कर्मकांड संस्कृती टाकून दिली आहे. प्राचीन काळात वैदिक संस्कृती आणि कृष्णाचे नेतृत्व असलेल्या यादव गणाने यज्ञ संस्कृतीला विरोध करून ती बंद पाडली होती. कारण शेतीपयोगी प्राणी यज्ञात पुरोहींताकडून बळी दिले जात, त्यामुळे हा संघर्ष उभा राहिला होता. आज, औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेण्यासाठी राज ठाकरे यांनी दिडशे पुरोहितांकडून आशिर्वाद घेतला. आशिर्वाद नेमका काय तर मंत्रोच्चार. सध्या एक मंत्राने महाराष्ट्रात वादळ उठलेले असताना. दिडशे पुरोहितांनी आशिर्वाद देण्यासाठी केलेला मंत्रोच्चार नेमका काय आहे, याचा अर्थ उलगडायला हवा.कारण कोणत्याही कार्यासाठी बहुसंख्यांक असलेला हिंदू समाज मंत्रोच्चार करून किंवा मंत्रोच्चारात आशिर्वाद घेऊन कार्याचा प्रारंभ करित नाही, हे उघड सत्य आहे. मात्र, राज ठाकरे यांनी पुरोहितांचा आशिर्वाद घेणाऱ्या संस्कृतीचे केलेले उदात्तीकरण हे बहुसंख्यांक हिंदूचा अपमान करणारी बाब आहे. ज्या पुरोहीतशाहीने हिंदू समाजाला कायम शूद्र म्हणून अपमानित केलेले त्याच पुरोहितांचा आशिर्वाद घेणे म्हणजे बहुसंख्यांक हिंदू समाजाला वेठीस धरणे होय. भोंग्यांच्या नावावर शिमगा करून शूद्रांना हिंदू म्हणून एकत्र आणून मुस्लिम विरोधात झुंजवण्याचा डावपेच हा हिंदूंच्या हिताचा नाहीच! कारण हिंदू -मुस्लिम संघर्ष  लावून त्यात बहुसंख्यांक समाज असलेल्या हिंदूंना आणि त्याच्या पाल्यांना गुंतवून ठेवण्याचा हा डाव असतो; जेणेकरून हिंदू ओबीसी म्हणून आपली जनगणना आणि आरक्षणाची मागणी करू शकत नाही. जी पुरोहितशाही आणि तिचे उदात्तीकरण करणारे  यांच्यासारख्यांच्या पत्थ्यावर पडणारे असते. खरे तर हिंदूंचे प्रश्न सुटू नयेत, त्यांना न्याय मिळू नये यासाठी असा धर्मांध अटृटाहास केला जातो. देशातील सर्व हिंदूंची मागणी आहे की, हिंदूंची जातीनिहाय जनगणना होण्याची मागणी लावून धरली आहे. परंतु या जनगणनेची मागणी रस्त्यापासून तर संसदेपर्यंत लावून धरणाऱ्या हिंदू नेत्यांना राजकारणातूनच हद्दपार करण्यासाठी पुरोहीतशाहीच्या पायिकांनी सर्व प्रयत्न केले. परिणामी आज हिंदूंच्या कल्याणाचे राजकारण नावाला शिल्लक राहिले नाही. राज ठाकरे यांना खऱ्या अर्थाने हिंदूंचे हित जोपासायचे असेल तर त्यांनी भोंगे वाजवा किंवा हटवासाठी नव्हे तर, हिंदूंची जातीनिहाय जनगणना करण्यासाठी दिल्लीत जाहीर सभा घ्यावी, आम्ही स्वतः त्यांच्या सभा देशभर लावण्यासाठी पुढाकार घेऊ. राज ठाकरे यांचे सध्याचे प्रसारमाध्यमांच्या भिस्तीवर अवलंबून असलेल्या आंदोलनात हिंदू उतरत नाही आणि उतरणारही नाही. कारण हिंदू म्हणून आमचे प्रश्न वेगळे आहेत. सामाजिक आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याऐवजी कधी कोर्टाच्या माध्यमातून आरक्षणाला सुरूंग लावला जात आहे. तर जातीनिहाय जनगणनेच्या प्रश्नावर कायमचे दुर्लक्ष केले जाते आहे. अशा या वातावरणात आमचा हिंदू सैनिक म्हणून वापर करण्याची नैतिकता भोंगे हटवा आंदोलनात राज ठाकरे यांच्यासारख्या पुरोहित धार्जिण्या नेतृत्वाला राहत नाही!

COMMENTS