Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोळगावमध्ये भर दिवसा घरफोडी

पावणेतीन लाखांचा ऐवज पळविला

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, पांढरेवाडी येथील सार्थक आप्पासाहेब भोईटे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे दोन लाख 6

जिव्हाळाच्या दांडिया नाईटमध्ये रंगला दांडिया व गरबा नृत्य
आ लंके यांचे मुंबई त चर्चा खा सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुक | Nilesh Lanke | आपलं नगर | LokNews24
परदेशातून आलेल्या दहाजणांचा शोध सुरू…पाचजण सापडले

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, पांढरेवाडी येथील सार्थक आप्पासाहेब भोईटे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे दोन लाख 65 हजार रुपये सोन्याचे दागिने व रोख आठ हजार रुपये चोरून नेल्याची घटना चार मे 2024 रोजी दुपारी साडेतीन ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान कोळगाव पांढरेवाडी येथे घडली. याबाबत सार्थक भोईटे यांनी बेलवंडी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की चार मे रोजी दुपारी साडेतीन ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घरी कोणीही नसताना चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून दोन लाख 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यात गंठण, साखळी, कर्णफुले असा ऐवज व रोख आठ हजार रुपये चोरून नेले. दोन दिवसापूर्वीच आनंदवाडी खामकर मळा येथून दोन लाख रुपयाची चोरीची घटना ताजी असतानाच दोन दिवस उलटतात न उलटतात तोच पुन्हा कोळगाव ( पांढरवाडी) येथे ही पावणे तीन लाख रुपये चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भर दुपारी ही घरपोडी करून चोरट्यांनी बेलवंडी पोलीसांना जणू कडवे आव्हानच दिले आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, बेलवंडीचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखे च्या पथकानेही सदर ठिकाणी भेट दिली आहे. तातडीने ठसे तज्ञ तसेच श्‍वानपथक यांना पाचारण करण्यात आले असून पथकाने आपले काम सुरू केले आहे. घटनेचा अधिक तपास पो.स.ई मोहन गाजरे हे करीत आहेत.

COMMENTS