अहमदनगर : बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आतील सामानाची उचकापाचक करून कपाटातील ४६ हजार ५०० र

अहमदनगर : बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आतील सामानाची उचकापाचक करून कपाटातील ४६ हजार ५०० रुपये रोख रक्कम आणि ओपो कंपनीचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा छपन्न हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज चोरून गेला. ही घटना लाल टाकी परिसरातील सिद्धार्थ नगर येथील म्युन्सिपल कॉलनी येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की आकाश प्रकाश सीतापुरे ( वय 26 राहणार सिद्धार्थ नगर मुन्सिपल कॉलनी अहमदनगर) यांच्या घरातील सदस्य त्यांच्या खानावळीमध्ये गेलेले असताना सायंकाळच्या वेळी आकाश सीतापुरे यांनी त्यांचे पाळीव कुत्रे घराच्या आत ठेवून घराला व्यवस्थित कुलूप लावून खानावळीत गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील सामनाची उचकापाचक करून कपाटातील 46 हजार पाचशे रुपये रोख रक्कम व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा 56 हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
आकाश सीतापुर यास त्याच्या मित्र लतेश रणमले याचा फोन आला की तुमचा घरचा दरवाजा उघडा आहे कुत्रीही बाहेर आहे. कुलूप लावून का गेला नाही. यावर सितापुरे यांना घरी चोरी झाल्याचा संशय आल्याने तो तातडीने घरी गेला व घरातील पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी आकाश सितापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 454, 380 अन्वये घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस हवालदार गोर्डे करीत आहे
COMMENTS