जयपूर ः राजस्थानातील जयपूरच्या दोन मोठ्या रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी रविवारी देण्यात आली आहे. जयपूर शहरातील सीके बिर्ला आणि मोनी

जयपूर ः राजस्थानातील जयपूरच्या दोन मोठ्या रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी रविवारी देण्यात आली आहे. जयपूर शहरातील सीके बिर्ला आणि मोनीलेक रुग्णालयामध्ये ही बॉम्बची धमकी मिळाली आहे. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. तसेच, रूग्णांना रुग्णालयांतून बाहेर काढून तपासणी केली जात आहे. दोन्ही रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने असल्याचे सांगण्यात आले आहे.
COMMENTS