Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शुक्राचार्य मंदिर सेवकांचा कामगार दिनी सन्मान

कोपरगाव शहर ः मे महिन्यातील पहिली तारीख म्हणजेच 1 मे हा दिवस संपूर्ण जगभरात कामगारांना व मजुरांना समर्पित केला जातो म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय

बेपत्ता आईचा शोध लावा, मुलांचे पोलिसांना साकडे
रुईगव्हाणच्या सरपंचपदी इंदिरा निलेश पवार बिनविरोध
LokNews24 : पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यावर फरफटत नेलंं

कोपरगाव शहर ः मे महिन्यातील पहिली तारीख म्हणजेच 1 मे हा दिवस संपूर्ण जगभरात कामगारांना व मजुरांना समर्पित केला जातो म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस कामगारांचा सन्मान करण्यासोबतच कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवता यावा, कामगारांचे समाजात स्थान अधिक मजबूत व्हावे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून सबंध जगभर मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असतो त्याच अनुषंगाने जगभरात प्रसिद्ध असलेले कोपरगाव येथील एकमेव परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मंदिराची तन-मन लावून अहोरात्र सेवा करत असणार्‍या मंदिर सेवकांचा मंदिर कमिटीच्या वतीने कामगार दिनी सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या. बुधवार दि 1 मे रोजी कोपरगाव येथील परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराचे व्यवस्थापक राजाराम पावरा, मंदिर पुजारी नरेंद्र जोशी गुरु, राकेश भणगे गुरु, मंदिराच्या अन्नपूर्णा शोभा कुलकर्णी, शोभा ढाकणे व सुभाष ढाकणे आदी सेवकांचा मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्‍हे,कमिटी सदस्य आदिनाथ ढाकणे आदींनी जागतिक कामगार दिनाच्या औचित्य साधत मंदिर सेवकांचा सन्मान करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

COMMENTS