Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत ज्ञानेश्‍वर स्कूलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

कोपरगाव शहर ःआपल्या आयुष्यात आपले आजी-आजोबा यांच्या प्रमाणेच अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. अनेकदा आपण त्यांच्याकडे, त्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या

पीक विमा कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ ;महसूलमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील
सरनाई यांच्या पत्राची लिंक ठाकरे-मोदी भेटीत! l DAINIK LOKMNTHAN
ओबीसी आरक्षणात सरकार आणणारेच झारीतील शुक्राचार्य ; माजी मंत्री बावनकुळे यांची शरद पवारांचे नाव न घेता टीका

कोपरगाव शहर ःआपल्या आयुष्यात आपले आजी-आजोबा यांच्या प्रमाणेच अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. अनेकदा आपण त्यांच्याकडे, त्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या बोलण्याकडे सहज दुर्लक्ष करतो. 1988 मध्ये,अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी हीच समस्या लक्षात घेतली आणि ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या जीवनमानावर परिणाम करणार्‍या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा करण्याची घोषणा केली.  याचे औचित्य साधून संत ज्ञानेश्‍वर इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये ’ज्येष्ठ नागिरक दिन’ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चांदगव्हाण जिल्हा परिषदच्या ज्येष्ठ माजी मुख्याध्यापिका  उषाताई भोईर या होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.एस.एन.एल. मधील माजी वरिष्ठ कर्मचारी ज्ञानदेव मोरे होते. तसेच शाळेच्या परिसरात राहात असलेले जेष्ठ नागरिक राजेंद्र  जंगम,साईनाथ बेकरी प्रॉडक्टचे संस्थापक साईनाथजी सोनवणे, सिव्हील इंजिनियर हेमंतजी भोईर, शाळेचे जेष्ठ कर्मचारी चंद्रहंस पाबळे व श्रीमती पुष्पा दळवी यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे कार्यकारी संचालक विशाल झावरे,शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे,शाळेचे कर्मचारी सचिन मोरे,विजय शिंदे व स्मिता भागडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते ज्ञानेश्‍वर माऊली व माता सरस्वतीचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मुलांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करून दाखअसेे. या विद्यार्थ्यांना बघून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले व आता तुमच्या सोबत पुन्हा शाळेय जीवन जगण्याचा आनंद घ्यावसा वाटतो. शाळेचा शंभर टक्के निकाल व मुलांची शिस्त अतिशय कौतुकास्पद आहे. असे मार्गदर्शन ज्येष्ठ माजी मुख्याध्यापिका उषाताई भोईर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक सचिन मोरे यांनी करून दिला. तसेच शाळेच्या शिक्षिका चैताली पुंडे यांनी जागतिक जेष्ठ नागरिक दिना विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पूनम सूर्यवंशी यांनी केले तर आभार उप मुख्याध्यापिका वैशाली लोखंडे यांनी मानले.

COMMENTS