निघोज ः पारनेर तालुक्यातील पिंपळनेर ग्रामपंचायतीच्या वतीने पिंपळनेर येथील कु श्रुतिका सुनील गोरे ही विखे फाऊंडेशन विळद घाट अहमदनगर येथे एमबीबीएस
निघोज ः पारनेर तालुक्यातील पिंपळनेर ग्रामपंचायतीच्या वतीने पिंपळनेर येथील कु श्रुतिका सुनील गोरे ही विखे फाऊंडेशन विळद घाट अहमदनगर येथे एमबीबीएस शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत असुन तिचा सत्कार 15ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायत पिंपळनेर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रथमेश राजेंद्र गोरे इयत्ता 10 वीमध्ये न्यू इंग्लिश स्कुल पारनेर घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्यांचाही सत्कार ग्रा पंसदस्य बाळासाहेब गाडे यांचे हस्ते करण्यात आला. कुमारी श्रुतिका सुनील गोरे हीचा सत्कार सरपंच देवेंद्र लटांबळे, माजी सरपंच सुभाष गाजरे, व ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गाडे यांच्यामार्फत करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाखारे साहेब होते. कार्यक्रमास उपसरपंच छाया कळसकर, माजी सरपंच भाऊसाहेब लटांबळे, सोसायटी सभासद विकास रासकर, संत निळोबाराय विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार, विजूशेठ गुगळे, सुरेश होले, पप्पू लटांबळे, उपसरंपच राजु रासकर, मेजर संभाजी रासकर, सपंत सावंत, सुरेश रासकर, व इतर मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS