Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव

आदर्श शिक्षक सदाशिव थोरात गुरुजींचा रुई (धारूर) येथे भव्य सत्कारकेज । प्रतिनिधीकेज तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, असोला येथे कार्यरत असले

नांदेडचे शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराच्या दलदलीत !
शैक्षणिक चळवळीचा वारसा जपण्यासाठी एकत्र येण्याची गरज : भोस 
शिक्षणाला आध्यात्मिकतेची जोड देण्याची गरज : माजी आ. पिचड

आदर्श शिक्षक सदाशिव थोरात गुरुजींचा रुई (धारूर) येथे भव्य सत्कार
केज । प्रतिनिधी
केज तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, असोला येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष शिक्षक श्री. सदाशिव थोरात गुरुजी यांना जिल्हा परिषदेचा प्रतिष्ठेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल रुई (ता. धारूर) येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
हनुमान मंदिर परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. रमेशराव आडसकर यांच्या हस्ते थोरात गुरुजी व त्यांच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रा. ईश्वर मुंडे सर (ज्येष्ठ विचारवंत), सुनीलभाऊ शिनगारे (उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती) यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारप्रसंगी बोलताना मा. रमेशराव आडसकर म्हणाले, शिक्षक हा समाजाचा कणा आहे. थोरात गुरुजींनी असोला शाळेत दिलेले योगदान व विद्यार्थ्यांमध्ये घडवलेले सकारात्मक परिवर्तन प्रेरणादायी आहे. अशा आदर्श शिक्षकांमुळेच ग्रामीण भागातील पिढी घडत आहे. हा कार्यक्रम रुई येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. आपल्या गावातील सुपुत्राचा जिल्हा स्तरावर गौरव झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण होते. हनुमान मंदिराच्या पवित्र परिसरात पार पडलेल्या या सोहळ्याला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली. थोरात गुरुजींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, मान्यवरांनी त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS