Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 शितलकुमार गोरे  समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

भातकुडगाव फाटा/प्रतिनिधीः कला, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आबासाहेब काकडे विद्यालय, शेवगाव येथील कलाशिक्षक शितलकुमार विठ

जोतिबाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या शेतमजुरांची ट्रॅक्टर ट्रॉली उलटली ; एक ठार, 20 जण जखमी |
महीलांनो घाबरु नका.. आपल्या सोबत जनसेवा फौंडेशन कायम सोबत आहे : सौ. शालिनीताई विखे पाटील
संगमनेरमध्ये सतराशे किलो गोमांस जप्त

भातकुडगाव फाटा/प्रतिनिधीः कला, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आबासाहेब काकडे विद्यालय, शेवगाव येथील कलाशिक्षक शितलकुमार विठ्ठलराव गोरे यांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार संग्राम भैय्या जगताप, अभ्युदय बँकेचे चेअरमन संदीपदादा घनदाट, यांच्या शुभहस्ते समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी भरतकुमार बाविस्कर, अधिक्षक अभियंता, सा.बां.वि.अ.नगर, भूषण अहिरे, प्रांताधिकारी, पाचोरा जि.जळगाव, डॉ.सागर बोरुडे,नगरसेवक,मनपा अहमदनगर, सुनील त्रिंबके नगरसेवक मनपा अहमदनगर, संजयजी खामकर, प्रदेशाध्यक्ष, सुभाष चिंधे प्रदेश सचिव, आदी मान्यवर उपस्थित होते.
 चर्मकार विकास संघ व लोकनेते मा.आ. सितारामजी घनदाट (मामा) प्रतिष्ठान, अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा अहमदनगर येथिल लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, येथे रविवार, दि.20 ऑगस्ट रोजी आयोजित केला होता. कलाशिक्षक शितलकुमार विठ्ठलराव गोरे यांना मिळालेल्या  पुरस्काराबद्दल कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे  डॉ.विद्याधर काकडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण बिटाळ, विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते, उपमुख्याध्यापिका  मंदाकिनी भालसिंग, पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड, पर्यवेक्षक सुनील आव्हाड विद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

COMMENTS