Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मधुकर म्हसे पाटील समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

देवळाली प्रवरा ः क्रांतीसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबरोबर परिसरातील विविध प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम करणारे क्रां

गुरुवर्यांच्या हस्ते झालेला सत्कार सेवाकार्याला बळ देणारा
नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुखाला मिरवणुकीत गटबाजीचा राडा l पहा LokNews24
कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचे शिक्षन क्षेत्रात मोठे योगदान ; डॉ. राऊत

देवळाली प्रवरा ः क्रांतीसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबरोबर परिसरातील विविध प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम करणारे क्रांतीसेनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख मधुकर म्हसे पाटील यांना दिशाशक्ती मिडिया समूहाच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील आण्णासाहेब शिंदे सभागृहात दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. विद्यार्थीदशेतच मधुकर म्हसे पाटील यांनी राहुरी महाविद्यालयाचे विद्यापीठ प्रतिनिधी ते पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे सचिव व विद्यापीठाचे अधिसभा सदस्यपद भूषविले. तसेच छावा मराठा युवा संघटनेचे अहमदनगर विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ते क्रांतीसेनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख म्हणून काम करताना विद्यार्थी, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबरोबर परिसरातील विविध प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने केले आहे. या पुरस्काराबद्दल क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील, अध्यक्ष संतोष तांबे, सरचिटणीस नितीन देशमुख, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, बबनराव धोंडे, शरद गाडे, सुनिल कडू, बाबासाहेब चेडे, रंगनाथ माने, मच्छिंद्र जगताप, अरुण थोरात, जालिंदर शेडगे, महेश तनपुरे, सुरेश म्हसे, राजेंद्र पेरणे, गोविंद वने, संदीप ओहोळ, ज्ञानेश्‍वर भिंगारदे, संदीप उंडे, भगवान पेरणे, नवनाथ ढगे, श्याम कदम, सुभाष दरेकर, हर्षद धोंडे, सोमनाथ वने, सचिन गागरे, शेखर पवार, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS