गडचिरोली : गडचिरोली सी-60 पोलिस जवानांनी शनिवारी 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले यासाठी नक्षल विरोधी पथकाला शुभेच्छा व प्रशस्तीपत्र देऊन महाराष्ट्रा
गडचिरोली : गडचिरोली सी-60 पोलिस जवानांनी शनिवारी 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले यासाठी नक्षल विरोधी पथकाला शुभेच्छा व प्रशस्तीपत्र देऊन महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सत्कार करून पोलीस जवानांचा कौतुक केले.
यावेळी भूषणकुमार उपाध्याय अतिरिक्त पोलीस महासंचालक,छेरिंग दोरजे पोलीस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान), संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अंकित गोयल पोलीस अधीक्षक गडचिरोली उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती मर्दिनटोला जंगल परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करून माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेल्या मिलिंद तेलतुंबडे सह 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.नक्षलविरोधी पोलीस तुकड्यांचे कमांडर व सी-60 जवानांचा सत्कार व ऑपरेशन हेड असलेले अतिरिक्त पोलीस अधिक्षक सोमय मुंडे व पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांचा महाराष्ट्र शासनाकडून गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले की गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी युवकांना आगामी पोलीस भरती मध्ये प्राधान्य देऊ .सी-60जवानांच्या या कामगिरीचे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे.आपल्या जीवाची पर्वा न करता सी-60जवानांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या कॅडरला कंठस्नान घालण्यात यश मिळविले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला विकास हवा आहे.त्यामुळे नक्षलवाद्यांनी बंदुका खाली ठेवून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला गृहमंत्री यांनी मानवंदना दिली.
COMMENTS