Homeताज्या बातम्यामनोरंजन

हॉलिवूड अभिनेता अल पचिनो वयाच्या ८३ व्या वर्षी होणार बाबा

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अल पचीनो हा वयाच्या 83 व्या वर्षी चौथ्यांदा बाप होणार आहे. अभिनेत्याच्या प्रतिनिधीने माहिती दिली आहे की, अल पचीनो आणि

श्रीगोंदा नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढणार
हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा : उद्धव ठाकरे | LOK News 24
‘आमचा न्यायालयावर पुर्णपणे विश्वास’ मलिक यांच्या बहीणीची प्रतिक्रिया | LOKNews24

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अल पचीनो हा वयाच्या 83 व्या वर्षी चौथ्यांदा बाप होणार आहे. अभिनेत्याच्या प्रतिनिधीने माहिती दिली आहे की, अल पचीनो आणि त्याची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्याचं आगमन होणार आहे. नूर ही आठ महिन्यांची गरोदर आहे. अल पचीनो हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अल पचीनोची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह ही 29 वर्षाची आहे. ती एप्रिल 2022 पासून अल पचीनोला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. एकदा दोघांना डिनर डेटला जाताना स्पॉट करण्यात आलं होतं. नूर अलफल्लाहनं यापूर्वी ज्येष्ठ गायक मिक जेगर आणि मिलेनियर निकोलस बर्गरेन यांना डेट केले होते. अल पचीनो आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड जॉन टेरंट यांना ज्युली नावाची मुलगी आहे. ज्युली ही 33 वर्षाची आहे.1997 ते 2003 या काळात अल पचीनोनं बेव्हरली डी’एंजेलोला डेट केलं. बेव्हरली डी’एंजेलो आणि अल पचीनो यांना अँटोन आणि ऑलिव्हिया ही जुळी मुलं आहेत. या मुलांचे वय 22 वर्ष आहे. आता अल पचीनो हा चौथ्यांदा बाप होत आहे.

COMMENTS