Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुसळधार पावसामुळे शाळा आणि कॉलेजना सुट्टी जाहीर

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील अनेक भागात

अतिवृष्टीने नुकसानग्रस्तांसाठी धोत्रेचे सरपंच गेले धावून
मुंबईत तीन दिवसापासून पावसाचा जोर कायम
वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाचा मुंबईला जोरदार तडाखा

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील अनेक भागात नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या सोबतच सावली तालुक्यातील चारगाव नदीला पूर आला आहे. काल रात्री सावली तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने चारगाव येथील पुलावरून नदीचं पाणी वाहत आहे. 18 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय आणि महाविद्यालय यांना 19 जुलै 2023 रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केले. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज 19 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या चार दिवसापासून रायगडला अक्षरशः पावसाने झोडपलेला आहे. तसेच विविध भागांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर येत आहेत.  रायगड जिल्ह्यातील चारही नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड भोईघाट येथील सावित्री नदी मही कावती मंदिर येथील सावित्रीचे पात्र भरले असून या घाटाला पाणी लागले आहे. तर रोहा मधील नागोठणे येथील बंधाऱ्यावरील अंबा नदी सध्या इशारा पातळीवर वाहते रोहे मधील शहरातून वाहणारी डोहवाल बंधारा येथील कुंडलिका नदी ही सध्या इशारा पातळीवर वाहत आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून  रायगड जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी हा निर्णय घेतला.

COMMENTS