Homeताज्या बातम्यादेश

हॉकी टीम इंडिया सलग तिसर्‍यांदा चॅम्पियन

नवी दिल्ली : हॉकी टीम इंडियाने धमाका केला आहे. मेन्स हॉकी टीम इंडियाने ज्युनियर आशिया कप ट्रॉफीवर सलग तिसर्‍यांदा आणि एकूण पाचव्यांदा नाव कोरलं आ

कोहलीचा नवा मोठा विक्रम
तन्मय कुंभार याची एअर पिस्तुल खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
नीरज चोप्राने रचला इतिहास

नवी दिल्ली : हॉकी टीम इंडियाने धमाका केला आहे. मेन्स हॉकी टीम इंडियाने ज्युनियर आशिया कप ट्रॉफीवर सलग तिसर्‍यांदा आणि एकूण पाचव्यांदा नाव कोरलं आहे. टीम इंडियाने ओमानमधील मस्कट येथे झालेल्या सामन्यात महाअंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत ट्रॉफी उंचावली आहे. गतविजेत्या टीम इंडिया यासह या स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेतील सर्व सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य राहिली. थोडक्यात सांगायचं झालं तर टीम इंडियाने खेळलेले सर्व सामने जिंकले. हॉकी टीम इंडियावर या विजयानंतर सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे. हॉकी टीम इंडियाने याआधी 2004, 2008, 2015 आणि 2023 साली ही ट्रॉफी जिंकली होती. पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धा 2024 चे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय पुरुष कनिष्ठ हॉकी संघाचे अभिनंदन पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धा 2024 चे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष कनिष्ठ हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर अभिनंदनपर संदेश लिहिला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात हॉकी मध्ये अजिंक्यपद पटकावलेल्या आपल्या संघाचा अभिमान वाटतो आहे! भारतीय हॉकीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असून, आपल्या पुरुष कनिष्ठ संघाने कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धा 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. त्यांचे अद्वितीय कौशल्य, अढळ निर्धार आणि विलक्षण सांघिक कामगिरीमुळे हा विजय क्रीडा वैभवाच्या इतिहासात कायमचा कोरला गेला आहे. युवा विजेत्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.

COMMENTS