Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी हिंगोलीच्या खासदाराचा राजीनामा

मुंबई / प्रतिनिधी ः मराठा आरक्षणाच्या मागणीने सध्या जोर धरला आहे. आमदार, खासदार, मंत्री आणि राजकीय नेत्यांविषयी मराठा समाजाच्या मनामध्ये तीव्र भा

देवगिरी प्रतिष्ठान बीड आयोजित साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे  राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धत लातूरची प्रतीक्षा मोरे प्रथम 
कस्टम अधिकारी सांगून 9 कोटींची फसवणूक
शेअर बाजाराने नोंदवला नवा विक्रम

मुंबई / प्रतिनिधी ः मराठा आरक्षणाच्या मागणीने सध्या जोर धरला आहे. आमदार, खासदार, मंत्री आणि राजकीय नेत्यांविषयी मराठा समाजाच्या मनामध्ये तीव्र भावना आहेत. त्यातच आता हिंगोलीच्या खासदारांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा. हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रामध्ये म्हटलें आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकर्‍यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठींबा असून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. असे पत्र लोकसभा अध्यक्षांच्या नावे रविवार, दि. 29 ऑक्टोबर रोजी खा. हेमंत पाटील यांनी लिहिले आहे. मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसोबत चर्चेची दारे खुली केली आहेत. जरांगे म्हणाले की, मी दोन दिवस बोलू शकतो. त्यामुळे दोन दिवसांमध्ये सरकारने मातब्बरांना चर्चेसाठी पाठवावे. नाहीतर परिस्थिती अवघड होईल. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

COMMENTS