मुंबई ः हिंडेनबर्ग यांनी केलेले आरोप सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांना घेरल्यानंतर संपूर्ण आरोप चुकीचे आणि तथ्यहीन अ
मुंबई ः हिंडेनबर्ग यांनी केलेले आरोप सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांना घेरल्यानंतर संपूर्ण आरोप चुकीचे आणि तथ्यहीन असल्याचा दावा माधवी पुरी बूच यांनी केला आहे. त्यानंतर सोमवारी हिंडेनबर्गने म्हटले आहे की, अद्याप अनुत्तरीत असणारे मुद्दे म्हणजे, माधवी पुरी बुच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अदानी समुहातील त्यांच्या गुंतवणुकीसंदर्भातील माहिती का देऊ शकल्या नाहीत? आणि सध्याच्या घडीला अध्यक्षपदी असतानाही त्या स्वत:ला चौकशीपासून दूर ठेवू का शकल्या नाहीत? असा सवाल उपस्थित केला आहे.
हिंडेनबर्गने सेबीच्या आणि अदानी समुहाच्या खुलाशावर म्हटले आहे की, सेबीच्या अध्यक्षपदी असणआर्या माधवी बुच या गौतम अदानी यांच्या उद्योगसमुहाशी जोडल्या गेलेल्या नावामुळे शॉर्ट सेलिंग फर्म, हिंडनबर्ग रिसर्चच्या निशाण्यावर आल्या. अधिकृतरित्या गुंतवणुकीसंदर्भातील माहिती कंपनीला देणे एका ठराविक हुद्यावर काम करणार्यांकडून अपेक्षित असते. काही कंपन्यांमध्ये कर्मचार्यांनी केलेल्या गुंतवणुकीसंदर्भातील माहिती नोकरदाराला देणे अपेक्षित असते. हा नियम या साखळीत येणार्या प्रत्येकालाच लागू असतो. मात्र सेबीच्या अध्यक्षांनी ही माहिती लपवून ठेवली. सेबीच्या अध्यक्षपदी असणार्या बुच यांनी सरकारकडे या गुंतवणुकीसंदर्भातील तपशील देणे अपेक्षित होते. बुच या एक खासगी क्षेत्रात सेवेत असणार्या व्यक्तीपैकी एक असून, त्या सरकारी कर्मचारी नसल्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांनी गुंतवणुकीच्या माध्यमातून विविध संस्थांच्या नियामक मंडळाची भागिदारी घेणे मान्य असले तरीही भविष्यातील कोणतीही अडचणीची परिस्थिती टाळण्यासाठी सरकारला त्यासंदर्भातील रितसर माहिती देणे अपेक्षित होते, असा दावा हिंडेनबर्गने केला आहे. तूर्तास करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी जागतिक स्तरावरील अदानी समुहाच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या हिंडनबर्गच्या अहवालातील माहितीनुसार बुच दाम्पत्याने परदेशी गुंतवणूकही केली असून, त्यामुळे अदानींच्या शेअरवर भूतकाळात परिणाम झाला होता. माधवी बुच यांच्या माहितीनुसार त्यांनी 2015 मध्ये अदानी समुहाशी संलग्न शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती. त्या सेबीच्या सदस्या होण्यापूर्वीचा हा काळ होता. दरम्यान, आपण सेबीकडून आखून दिलेल्या सर्व अटी आणि नियमांची पूर्तता केल्याचे बुच यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
त्यांच्याशी कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत – भांडवी बाजाराकडे सादर केलेल्या निवेदनात सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बूच आणि त्यांचे पती धवल यांच्याशी आपले कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत, असे अदाणी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले. सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या निवडक माहितीची मोडतोड करून पूर्वनिर्धारित निष्कर्ष काढण्यासाठी हे आरोप करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2024 मध्येच अदाणी समूहाविरोधातील आरोप फेटाळले असल्याचेही कंपनीचया उत्तरात नमूद करण्यात आले असून हिंडेनबर्ग केलेल आरोप द्वेषपूर्ण, खोडसाळ आणि फसवे असल्याची टीका अदाणी समूहाने केली आहे.
COMMENTS