हिजाब आणि जानवं

Homeताज्या बातम्यासंपादकीय

हिजाब आणि जानवं

हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही

भारताचा विजयी ‘षटकार’
रशिया-युक्रेनच्या युद्धाचा पुन्हा भडका
शोषणमुक्त विवाह

हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या. ते योग्यच. हिजाब वरून संपूर्ण देशात वातावरण गरम असतांना, त्याबद्दल सर्वांचे मते वेगवेगळे आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिल्यानंतर हैदराबादचे खासदार आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या निर्णयाने धर्म, संस्कृती, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार रद्द केले आहेत. आपल्या संविधानाची प्रस्तावना सांगते की, देशातील प्रत्येक नागरिकाला विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य आहे. कोर्टाच्या या निकालानंतर अत्यावश्यक धार्मिक प्रथा कोणत्या,  याचे पुनरावलोकन करण्याची वेळ आली आहे. धर्माभिमानी व्यक्तीसाठी सर्वकाही आवश्यक आहे आणि नास्तिकांसाठी काहीही आवश्यक नाही. धर्माबद्दल अभिमान असेलेल्या ब्राह्मणांसाठी जानवं आवश्यक आहे, परंतु ब्राह्मणेतरांसाठी ते असू शकत नाही. त्यामुळे न्यायाधीशांनी एखाद्या धर्माच्या अत्यावश्यक प्रथांचा निर्णय घेणं हा मुर्खपणा आहे. ही असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया डोळ्यात अंजन घालणारी आहे. हिजाबला कॉलेजमध्ये बंदी घालणाऱ्या विचारधारेच्या लोकांनी हिजाब सोबत इतर धर्माच्या प्रथा- परंपरेलाही विरोध केला पाहिजे. पण ते तसे करत नाहीत. आता कॉलेजमध्ये अनेकजण कपाळावर टिळा लावून येतात. हातात दोरे- गंडे, गळ्यात माळा वगैरे याला का विरोध नाही? ‍भारतात १२ धर्म, १२२ भाषा व १६०० बोलीभाषा बोलल्या जातात. त्यात प्रत्येकांच्या चालीरीती वेगळ्या आहेत. त्यामुळे त्याचे आचरण घरात करणे योग्य राहील. ते समाजात करण्याची किंवा तसा आग्रह धरण्याची काय गरज.
जवळपास सर्वच शाळा, कॉलेजमध्ये कार्यालयात सरस्वतीचा फोटो लावला जातो. हिंदू धर्मामध्ये सरस्वतीला विद्देची देवता म्हणून मान्यता आहे. पण ती मान्यता मुस्लिम धर्मात मान्य नाही त्याचे काय? मुस्लिम धर्मासोबत इतर अनेक धर्मात सरस्वतीला मान्यता नसल्यामुळे सरस्वती ही देवी विद्येचे दैवत आहे हे ते मान्य करत नाहीत. मग शाळा आणि कॉलेजमधील शिक्षण घेणाऱ्या सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांमध्ये ज्याचे त्याचे धार्मिक, सांस्कृतिक विचार, परंपरा भिन्न असल्यामुळे केवळ हिंदूंची धर्मांधता किंबहुना विचार आणि संस्कृती मान्य करायची का? आणि ती का करावी? दुसरे महत्वाचे म्हणजे आपला  देश हा संविधानावर चालतो. कुठल्या धर्मावर नाही. त्यामुळे संविधानातील कलम 14 – मध्ये राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही. कलम 15 – धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता धार्मिक रीती रिवाजाचे प्रदर्शने करणे म्हणजे सेक्युलर होणारे नाही. हिजाब आणि जानवं घरात ठेऊन सर्वानी सेक्युलर वर्तन व्यवहार करावा ही आशा.

COMMENTS