Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

2 विदेशी मॉडेलसह एका अभिनेत्रीला अटक

पुणे : पुण्यातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे पोलिसांनी वेश्याव्यवसायात गुंतलेली राजस्थानी अभिनेत्र

फूड डिलिव्हरी सर्व्हिस कंपनी झोमॅटोने 17 सप्टेंबरपासून किराणा मालाची डिलिव्हरी सेवा बंद
शेपवाडी गावातून कुंभार समाजातील पहिली महिला पोलीस
महिला टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा

पुणे : पुण्यातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे पोलिसांनी वेश्याव्यवसायात गुंतलेली राजस्थानी अभिनेत्री आणि उझबेकिस्तानमधील दोन मॉडेल्सना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसारस, पुणे पोलिसांच्या सुरक्षा विभागाने पुण्यातील विमान नगर भागात ही कारवाई केली. परदेशातून हे सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पुणे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमान नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाइन वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी सापळा रचून दोन उझबेक मॉडेलसह एका राजस्थानी अभिनेत्रीला ताब्यात घेतले आहे. उझबेकिस्तानमधील दोन मॉडेल ऑनलाइन वेश्या व्यवसाय चालवत होत्या. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुणे पोलिसांनी ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवणार्‍या आरोपींचा शोध सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला व्यवसायचा भांडाफोड केला होता. त्यावेळी चार मुलींची सुटका करण्यात आली होती.

COMMENTS