श्रीगोंदा : वंचितांना समुहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना मदत करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर महांडूळे
श्रीगोंदा : वंचितांना समुहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना मदत करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर महांडूळे यांनी केले. ते राहुल विद्यार्थी वसतिगृह श्रीगोंदा येथे शुभम गोरक्ष गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांनी वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्यांचाच विचाराचा वारसा राहुल वसतिगृहाच्या माध्यमातून पुढे चालू आहे, याचा आम्हाला सर्वस्वी अभिमान आहे. इथून पुढे वस्तीगृहास सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. गोरक्षनाथ गायकवाड यांना आपले वसतिगृहातील बालपण आठवले. विद्यार्थ्यांनी ध्येयाने प्रेरित होऊन अभ्यास करावा यश तुमच्याच हातात आहे हा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. ते म्हणाले माझा मुलाचा वाढदिवस डीजे लावूनही करू शकलो असतो परंतु गरजवंतांना मदत करणे हे माझ्यावर झालेल्या संस्कारामुळे मी तुम्हा सर्वांना मदत करत आहे. यावेळी प्रशांत चव्हाण सर, अनिल उबाळे, मेघना गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक सतीश ओहोळ यांनी केली.तर आभार प्रेमराज जाधव, यांनी मानले.
COMMENTS